शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

थायलंडमधील बचावकार्यात किर्लोस्कर कंपनीचे पथक, मिरजेतील प्रसाद कुलकर्णी यांची तांत्रिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 20:31 IST

थायलंड येथे जंगलात गुहेतील पुरात अडकलेल्या मुलांना वाचविण्यात मंगळवारी यश आले.

मिरज : थायलंड येथे जंगलात गुहेतील पुरात अडकलेल्या मुलांना वाचविण्यात मंगळवारी यश आले. या बचाव मोहिमेत तांत्रिक मदतीसाठी किर्लोस्कर कंपनीचे पंप, तसेच कर्मचा-यांचे पथक थायलंडला गेले होते. किर्लोस्कर कंपनीचे अभियंता, मिरजेतील प्रसाद कुलकर्णी यांच्यासह दोघे मदतकार्यात सहभागी झाले आहेत.थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या बारा मुलांच्या बचावासाठी जगातील अनेक देशांतील मदत पथके काम करीत होती. गुहेतील पुराच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी किर्लोस्कर कंपनीच्या उच्च क्षमतेच्या पंपांचा वापर करण्यात आला. थायलंडमध्ये किर्लोस्कर कंपनीचा पंपनिर्मितीचा कारखाना असून तेथे वारंवार पुराची समस्या उद्भवत असल्याने अनेक गावात किर्लोस्कर कंपनीने पाणी उपसा करणारे मोठे पंप कायमस्वरूपी बसविले आहेत. गुहेत अडकलेल्या मुलांच्या सुटकेसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात आला. मात्र संततधार पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या.थायलंड सरकारने पंपांद्वारे पाणी उपसा करण्यासाठी भारताकडे तांत्रिक मदतीची मागणी केली होती. यानुसार किर्लोस्करवाडी (ता. पलूस) येथील किर्लोस्कर कंपनीतील डिझाईन विभागप्रमुख प्रसाद कुलकर्णी हे कंपनीच्या पुण्यातील अन्य एका अभियंत्यासोबत थायलंडला रवाना झाले. थायलंड येथील किर्लोस्कर कंपनीच्या कर्मचा-यांच्या पथकासोबत प्रसाद कुलकर्णी मदतकार्यात सहभागी झाले. मदतकार्य सुरू असलेल्या ठिकाणी जंगलात विद्युतपुरवठा नसल्याने जनरेटरच्या साहाय्याने पाणी उपसा करणारे पंप अखंड सुरू ठेवण्याचे काम किर्लोस्कर कंपनीच्या पथकाने केले. इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशात किर्लोस्कर कंपनीचे कारखाने असून कंपनीचे पंप अनेक देशात पूरनियंत्रणासाठी वापरण्यात येत असल्याचे कंपनीचे मनुष्यबळ विभागप्रमुख रमेश विजापूर यांनी सांगितले. कृष्णा खोरे प्रकल्पातील ताकारी, म्हैसाळसह अन्य सिंचन योजनांसाठीही किर्लोस्कर कंपनीच्या पंपांचा वापर सुरू आहे. मदतकार्यासाठी तांत्रिक मदतीच्या मागणीमुळे मिरजेतील प्रसाद कुलकर्णी यांच्यासह दोघांना शुक्रवारी तातडीने थायलंडला पाठविण्यात आले. शनिवारी सायंकाळपासून कुलकर्णी सहकाºयांसोबत मदतकार्यात सहभागी होते. प्रसाद कुलकर्णी व त्यांच्या पथकाच्या कामाचे सोशल मीडियावरून कौतुक सुरू आहे. कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क होऊ शकला नाही. मात्र मिरजेतील मित्रांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी थायलंडमधील बचावकार्याची माहिती दिली.

अखंड पाणी उपसायांत्रिकी (मेकॅ निकल) अभियंता असलेले प्रसाद कुलकर्णी गेली २५ वर्षे किर्लोस्कर कंपनीत काम करीत आहेत. अन्य देशांच्या तज्ज्ञांसोबत त्यांनी व किर्लोस्कर कंपनीच्या पथकाने पाणी उपसा करणारी यंत्रणा अखंड सुरू ठेवण्याचे काम केले. अखंड पाणी उपसा करून गुहेतील पाण्याची पातळी स्थिर ठेवून पाणबुड्यांद्वारे गुहेतील मुलांना बाहेर काढण्यात यश आले.

टॅग्स :Sangliसांगली