जत : खोजनवाडी, ता. जत येथे दारू का पिऊ नको म्हणलास म्हणून शशिकांत काडेश शिवणूर, वय ३६, रा. खोजनवाडी, ता. जत यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून गुरुबसव विठ्ठल कनमडी, विठ्ठल शिवगोंडा कनमडी, शंकर विठ्ठल कनमडी, सुरेश विठ्ठल कनमडी, सर्व रा. खोजानवाडी या चार जणांच्या विरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल आहे. ही घटना गुरुवारी रात्री खोजनवाडीत घडली.
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुबसव हा दारू पिऊन शशिकांत यांच्याकडे आले होते. सुरुवातीला त्यांच्या दोघांत बाचाबाची झाली. त्यानंतर तू दारू पिऊन आमच्याकडे येऊ नकोस दारू पिल्यानंतर व्यवस्थित बोलत नाहीस, असे त्याला त्यांनी सांगितल्यानंतर त्याने त्याचे ऐकले नाही. त्यामुळे वरील चौघा संशयितांनी कुऱ्हाडीने डोक्यात वार करून शशिकांत याला गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार लक्ष्मण बंडगर करत आहेत.