शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

खानापुरात पुन्हा अनिलभाऊच!

By admin | Updated: February 23, 2017 23:00 IST

तालुक्यात भगवे वादळ : परिवर्तन आघाडीला नाकारले

दिलीप मोहिते-- विटा  -जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी ग्रामीण भागावर पूर्णपणे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले असून, जिल्हा परिषदेच्या सर्व तीनही जागा व पंचायत समितीच्या सहापैकी पाच जागांवर विजय मिळवून पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. त्यामुळे खानापूर पंचायत समितीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या परिवर्तन आघाडीला मतदारांनी नाकारून, आ. अनिलभाऊंचीच सत्ता कायम ठेवत तालुक्यात भगवे वादळ निर्माण केले आहे. त्यामुळे एकतर्फी विजय मिळविलेल्या शिवसेनेपुढे कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपचाही करिष्मा दिसून आला नाही.खानापूर तालुक्यात शिवसेनेचे आ. बाबर यांच्याविरूध्द कॉँग्रेसचे माजी आ. पाटील व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. मुळीक यांनी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढत दिली होती. आ. बाबर यांनी सर्व उमेदवार शिवसेना पक्षाच्या चिन्हावर मैदानात उतरविले होते, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने ऐनवेळी पक्षाचे एबी फॉर्म नाकारून आघाडीचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. कारण आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचविण्यात त्यांना फारसे यश आले नाही.आ. बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने तालुक्यातील तीनही जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या. कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भाळवणी गटातही त्यांनी भगवे वादळ निर्माण करून जिल्हा परिषदेच्या नवीन जागेची कमाई केली. मात्र, भाळवणी गणात शिवसेनेच्या बंडखोरीचा फटका आ. बाबर यांना बसल्याने, तेथील जागा कॉँग्रेस व राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन आघाडीच्या हाताला लागली. तसेच दुसरीकडे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना बाजूला सारून पुष्पलता सकटे यांना पक्षाच्या चिन्हावर मैदानात उतरविले, तर सदाशिवराव पाटील यांनी परिवर्तन आघाडीतून वंदना गोतपागर यांना रिंगणात उतरविल्याने, कॉँग्रेसच्या गटबाजीचा फटका भाळवणीत बसल्याचे दिसून आले.द्वेषाचे राजकारणनिवडणुकीत विरोधकांनी केवळ व्यक्तिद्वेषाचे राजकारण केले. मतदारांनी धनशक्तीला बाजूला ठेवून जनशक्तीचा विजय केला आहे. खानापूर पंचायत समितीच्या माध्यमातून केलेली विकास कामे व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केल्यामुळे यश संपादन करू शकलो. आगामी काळातही विकास कामांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे नेते आ. अनिल बाबर यांनी निकालानंतर बोलताना दिली.