शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळच्या दोन पोलिसांना १५ हजाराची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 13:16 IST

वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागज फाट्यावर बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.

ठळक मुद्देकवठेमहांकाळच्या दोन पोलिसांना १५ हजाराची लाच घेताना अटकनागज फाट्यावर सापळा : वाळू वाहतूकदाराकडून स्विकारली लाच

सांगली : वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागज फाट्यावर बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.प्रमोद मारुती रोडे (वय ३२) व सुनील मल्हारी घोडके (२९) अशी अटक केलेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ माजली आहे.तक्रारदार कवठेमहांकाळ परिसरातील आहेत. त्यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. पहाटेच्यावेळी ते ट्रकमधून वाळूची वाहतूक करतात. प्रमोद रोडे व सुनील घोडके यांनी तक्रारदारास वाहतूक करताना अडविले. कारवाईची धमकी देऊन २० हजार रुपये लाचेची मागणी केली.

चर्चेअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकारानंतर तक्रारदाराने सांगलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागातील विशेष पथकाने तक्रारीची चौकशी केली. यामध्ये रोडे व घोडके यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.रोडे व घोडके यांनी तक्रारदारास बुधवारी रात्री नागज फाट्यावरील हॉटेल शिवकृपाजवळ लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले होते. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने सापळा लावला. रोडे व घोडके लाचेची रक्कम स्विकारल्याचा सिग्नल मिळताच पथकाने त्यांना पकडले. अनपेक्षित झालेल्या या कारवाईने रोकडे व घोडके यांना ऐन थंडीत घाम फुटला.पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, हवालदार भास्कर भोरे, जितेंद्र काळे, संजय कलगुटगी, अविनाश सागर, संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ, श्रीपती देशपांडे, बाळासाहेब पवार, स्वाती माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली