शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: विमानतळाच्या जागेप्रकरणी कवलापूर ग्रामपंचायत न्यायालयात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 12:23 IST

शासनाने मूळ उद्देश बाजुला ठेवून जागा वर्ग केली, आता जागेचा व्यवहार केला आहे.

बुधगाव : कवलापूर विमानतळाची जागा एका खासगी कंपनीला विकली गेली आहे. ही जागा विमानतळासाठी दिली होती. मात्र, शासनाने मूळ प्रकल्प न राबवता ही जागा एमआयडीसीला वर्ग करून जागेची विक्री केली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीच्यावतीने न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय कवलापूर ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. तसेच याप्रकरणी विमानतळ जागा बचाव कृती समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे सरपंच सुषमा पाटील व ग्रामपंचायत सत्ताधारी गटनेते भानुदास पाटील सांगितले.कवलापूर ग्रामपंचायतीची मासिक बैठक सोमवारी सरपंच सुषमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला ग्रामसेवक सचिन पाटील, उपसरपंच प्रमोद पाटील, सत्ताधारी पक्षाचे गटनेते, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य निवास पाटील, सौरभ पाटील, शरद पवळ, कुमार पाटील, सदस्या शुभांगी नलावडे, चंदाबाई ढवणे, उज्ज्वला गुंडे, वंदना मोहिते, विद्याताई माळी उपस्थित होते.कवलापूर येथील विमानतळाची तब्बल १६० एकर जागा गुजरात येथील श्री श्रीष्टा या खासगी कंपनीला दिली गेली आहे.

ही जागा ग्रामपंचायतीला मिळणे आवश्यक असल्याचा मुद्दा ग्रामपंचायत सदस्य शरद पवळ यांनी सभेत मांडला. यावर सविस्तर चर्चा झाली. ग्रामपंचायत सत्ताधारी गटनेते भानुदास पाटील म्हणाले, कवलापुरात विमानतळ व्हावा, म्हणून ही जागा देण्यात आली होती. मात्र, शासनाने मूळ उद्देश बाजुला ठेवला. ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता ही जागा परस्पर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडे वर्ग केली.शासनाने मूळ उद्देश बाजुला ठेवून जागा वर्ग केली, आता जागेचा व्यवहार केला आहे.

भविष्यात ग्रामपंचायतीला प्रकल्प राबविण्यासाठी जागा नाही. त्यामुळे या जागेचा व्यवहार रद्द व्हावा व जागा ग्रामपंचायतीला मिळावी म्हणून न्यायालयीन लढा लढू, अशी भूमिका पाटील यांनी मांडली. उपसरपंच प्रमोद पाटील यांनी जागेसंदर्भात जागा बचाव कृती समितीची स्थापना करावी, अशी मागणी केली. ग्रामपंचायत सदस्य निवास पाटील व माजी उपसरपंच सौरभ पाटील यांनीदेखील जागेसंदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले. सरपंच सुषमा पाटील यांनी जागेच्या व्यवहाराविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात कवलापुरातील तज्ज्ञ व्यक्तिंना घेऊन विमानतळ जागा बचाव कृती समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या.

टॅग्स :SangliसांगलीAirportविमानतळ