शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: आता पेट्रोल पंपवालेही म्हणताहेत, चला जाऊ कर्नाटकात!

By संतोष भिसे | Updated: December 2, 2022 19:17 IST

सीमेलगतचे शेतकरीही कर्नाटकातून आणतात तेल 

सांगली : काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील उद्योजक म्हणत होते, आम्ही कर्नाटकात जातो. सध्या जतमधील गावे म्हणताहेत, कर्नाटकात गेल्याशिवाय आमचा विकास होणार नाही. आता तर, सीमावर्ती भागातले पेट्रोल पंपवालेही म्हणायला लागलेत, चला जाऊ कर्नाटकात!सरकारच्या पैसे मिळवण्याच्या धोरणामुळे पंपचालक उद्वीग्न झाले आहेत. पंपचालक संघटनेच्या व्हॉटसॲप ग्रुपवर कर्नाटकात जाण्याचा मेसेज सध्या भलताच व्हायरल झाला आहे. तो हसण्यावारी नेण्यासारखा नसून सीमाभागातील पंपांची शोचनीय अवस्था दाखविणारा आहे. गेल्या १० वर्षांत इंधनाची सगळीच विक्री कर्नाटकने खेचून घेतली आहे. विशेषत: गेल्या वर्षभरात तर पंप अक्षरश: ओसाड पडले आहेत.मिरज, जतमध्ये अर्धा डझन पंपमालकांनी पंपांना कुलुपे लावून डोक्याचा ताप कमी करुन घेतला आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकात पेट्रोल व डिझेल स्वस्त आहे, त्यामुळे सीमाभागातील वाहनचालक कर्नाटकातच तेल भरुन घेतात. कर्नाटकात गेलेली वाहने परतताना तेथेच टाकी फुल्ल करुन घेतात. सीमेलगतचे शेतकरीही कर्नाटकातून तेल आणतात.महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्नाटकने इंधनाची करकपात केली होती. पेट्रोल नऊ रुपयांनी, तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. शिंदे सरकारने करामध्ये सूट दिली, तरी कर्नाटकातील तेल अजूनही स्वस्तच आहे. यामुळे तेथील पंप हाऊसफुल्ल, तर महाराष्ट्रातील पंप ओस पडलेल्या अवस्थेत आहेत.गेल्या दहा वर्षांपासून पंपमालक सरकारपुढे माथेफोड करत आहेत. दरातील फरक कमी करण्याची मागणी करत आहेत. तोटा सहन करुन पंप चालवत आहेत. महसूलाच्या हव्यासाने शासन करकपातीस तयार नाही.

भरपाईची मागणीपंपमालक संघटनेने बारा वर्षांपूर्वीच्या सरासरी विक्रीनुसार नुकसान भरपाईची मागणी केली आहे, अन्यथा सीमाभागातील पंपमालकांना वेगळा विचार करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा दिला आहे. सध्या तरी संघटनेपुरता मर्यादीत असलेला उद्रेक लवकरच प्रत्यक्षात येऊ शकतो.

सीमावर्ती गावात समांतर पेट्रोल पंपजत, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांतील कर्नाटक सीमेवरील गावांत समांतर बेकायदा पंप सुरु झाले आहेत. कर्नाटकातून स्वस्तात डिझेल-पेट्रोल आणायचे, आणि महाराष्ट्रात दोन-चार रुपये जादा दराने विकायचे असा व्यवसाय जोरात सुरु आहे. गावातच स्वस्तात तेल मिळत असल्याने वाहनचालकांचाही प्रतिसाद आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक