शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

Sangli: म्हैसाळ येथे कर्नाटक बस-ट्रक्टरचा अपघात, एसटी बस खड्ड्यात कोसळून २५ प्रवाशी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:00 IST

म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे बुधवारी के मार्टजवळ कर्नाटकची बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यात उलटून बसचा ...

म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे बुधवारी के मार्टजवळ कर्नाटकची बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्येकर्नाटक बस खड्ड्यात उलटून बसचा चालक अशोक हुन्नुर (वय ४५, रा. अथणी) यांच्यासह २५ प्रवाशी जखमी झाले. जखमीवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला.अधिक माहिती अशी, कर्नाटक महामंडळाची (केए २३ एफ १००५) ही बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती. यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा रिकामा ट्रॅक्टर (एमएच १० डीएन ९५५७) दोन ट्रेलरसह म्हैसाळच्या दिशेने येत होता. कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली. त्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने कर्नाटक बस अंदाजे तीस फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली. या बसमधून ४० प्रवाशी प्रवास करीत होते. अपघातानंतर म्हैसाळ येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.बसचा चालक मात्र बराच वेळ बसमध्ये अडकला होता. बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे. शर्थीचे प्रयत्न करून बसचालकांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमीवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजित सिद, रणजित तीपे, म्हैसाळचे बीट अंमलदार बळीराम पवार, यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.

वाहतुकीची कोंडीबुधवारी सकाळी साडेदहा वाजता हा अपघात झाल्याचे कळताच म्हैसाळ येथील तरुण तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व प्रवाशांना बाहेर काढले. यावेळी म्हैसाळ-कागवाड राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर वाहतूक शाखेचे पोलिस दाखल होताच वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.

म्हैसाळ येथील अपघातातील २५ जखमी प्रवाशी उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी पाच प्रवाशांनी डिस्चार्ज घेतला आहे. २० प्रवाशांना २४ तास रुग्णालयात ठेवणार आहोत. चालकाचा पाय मोडला असून सर्व प्रवाशांची प्रकृती ठिक आहे. -रूपेश शिंदे, उपअधीष्ठता, मिरज शासकीय रुग्णालय.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातKarnatakकर्नाटक