शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कडकनाथ कोंबडी पालन फसवणूक प्रकरणी इस्लामपुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:20 IST

मोर्चात राज्यभरातील फसवणूक झालेले गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

इस्लामपूर (जि. सांगली) : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात महारयत कंपनीकडून आठ हजार शेतकऱ्यांची ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज असून, कंपनीवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी आज इस्लामपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. प्रहार संघटना आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन हा मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात राज्यभरातील फसवणूक झालेले गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

यावेळी मारुती खाडे (सांगरुळ, जि. कोल्हापूर) म्हणाले की, शेतकऱ्यांनी पै पै साठवून या व्यवसायात गुंतवणूक केली. पैसे घेताना मंत्र्यांचा मुलगा हजर होता, सुधीर मोहिते, संदीप मोहिते हे संचालक हजर होते. मग आता याच्याशी आपला संबंध नाही, असे मंत्री कसे म्हणतात?रेश्मा पवार या पारधी महिलेने सांगितले की, सुधीर मोहितेलाही मोक्क्याखाली घाला.

निर्मला पवार म्हणाल्या की, नवरा मेल्यावर पोरांसाठी काहीतरी करूया म्हणून कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला. त्यातही तोटा झाला. चोरीचा धंदा सोडून चांगले काही तरी करावे म्हणून पैसे गुंतवले. शेतकरी, पारधी समाजाला फसवणाऱ्या या सर्वांना मोक्का लावा.उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी म्हणाला की, ९ लाख रुपये कर्ज काढून या कडकनाथ कोंबडी पालनात गुंतवले. ते पैसे मंत्र्यांनी परत करावेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय हलणार नाही.

टॅग्स :Sangliसांगली