शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये विवाहितेची तीन मुलासह आत्महत्या; कौटृंबिक वादातून कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 12:30 IST

कौटूंबिक वादातून जत येथील राधा सुभाष कोळी (वय ३२) या विवाहितेने तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजतमध्ये विवाहितेची तीन मुलासह आत्महत्या; कौटृंबिक वादातून कृत्यविहिरीत उडी : दोघांचे मृतदेह सापडले

सांगली : कौटूंबिक वादातून जत येथील राधा सुभाष कोळी (वय ३२) या विवाहितेने तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.राधा कोळी, त्यांची मुले यश (४ महिने), आराध्या (३ वर्षे) व प्रज्वल (४ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. राधा कोळी कुटूंबासह जतमधील मंगळवार पेठेतील कोळी गल्लीत राहत होत्या. त्यांच्या पतीचा बांधकामावर लिफ्ट पुरविण्याचा व्यवसाय आहे.

राधा यांचे सोलापूर जिल्ह्यातील माहेर आहे. सात वर्षापूर्वी त्यांचा सुभाष कोळी यांच्याशी विवाह झाला होता. गेल्या काही महिन्यापासून कौटूंबिक कारणावरुन राधा व सुभाष यांच्यात वाद सुरु होते. गुरुवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून राधा तिनही मुलांना घेऊन रात्री दहा वाजता घरातून बाहेर पडल्या. पतीने मध्यरात्रीपर्यंत शोध घेतला. पण राधा व मुलांचा सुगावा लागला नाही.शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता जतमधील यल्लमा मंदिर परिसरातील सार्वजनिक विहिरीत यश या चार महिन्याच्या चिमुरड्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यावरुन राधाने मुलांसह आत्महत्या केल्याचा संशय आला.

जत पोलीस, स्थानिक नागरिक व नगरपालिका यांनी संयुक्तपणे मोहिम राबवून राधा, आराध्या व प्रज्वलचा शोध सुरु ठेवला. साडेअकरा वाजता राधाचा मृतदेह सापडला. आराध्या व प्रज्वलचा शोध सुरु आहे. विहिरीकाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर राधा यांनी मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली