फोटो : शिरटे (ता. वाळवा) येथे युवा नेते जितेश कदम यांनी सभासदांशी संवाद साधला. यावेळी गुलाबराव पाटील, संजय पाटील, अजित पाटील उपस्थित होते.
शिरटे : यशवंतराव मोहिते यांच्यामुळे महाराष्ट्रातील सहकाराला दिशा देणारा साखर कारखाना म्हणून कृष्णाची ओळख झाली होती. भाऊंचे विचार पुन्हा रुजविण्यासाठी कदम घराणे नेहमीच इंद्रजीत मोहिते यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही भारती बँकेचे संचालक जितेश कदम यांनी दिली.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे पार्श्वभूमीवर येडेमच्छींद्र, किल्लेमच्छींद्रगड, कोळे, नरसिंहपूर व शिरटे येथे रयत पॅनेलच्या प्रचारावेळी ते बोलत होते.
यावेळी उमेदवार संजय पाटील, गुलाबराव पाटील-शिरटेकर, अजित पाटील-रेठरेकर, हणमंत पाटील, अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिरटे येथे सरपंच पृथ्वीराज पाटील, उपसरपंच अरुण देसाई, भीमराव पाटील, गोपीचंद पाटील, महादेव पाटील, विकास पाटील, किल्लेमच्छींद्रगड येथे अनिल थोरात, गणेश जगताप, राजेंद्र शिंदे, नरसिंहपूर येथे संपतराव सावंत, युवराज मोरे, नथुराम कुलकर्णी, सचिन जाधव कोळे येथे गुलाबराव पाटील उपस्थित होते.