शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

जयंतराव-तात्यांचा अबोला संपला..!

By admin | Updated: December 23, 2016 23:47 IST

एकमेकांवर स्तुतिसुमने : जिल्हा बँकेत दोघे एकत्र

सांगली : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून पक्षनेतृत्वावर टीका केल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील चांगलेच चर्चेत आले होते. या टीकेमुळे आमदार जयंत पाटील व दिलीपतात्या पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र शुक्रवारी जिल्हा बँकेच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले. दिलीपतात्यांनी जयंतरावांची स्तुती करीत मनोमीलनाचे नवे पर्व सुरू केले. चांगला माणूस, चांगला हात मला हवा होता, तो जयंतरावांच्या रूपाने मिळाल्याचे सांगत त्यांना खूश करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील दुसऱ्या मजल्याच्या नूतनीकरणाचे उद्घाटन शुक्रवारी जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्चून या मजल्याला ‘कॉर्पोरेट लुक’ देण्यात आला आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने जिल्हा बँकेत जयंत पाटील व दिलीपतात्या एकाच व्यासपीठावर आले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतून दिलीपतात्या पाटील इच्छुक होते. पण ऐनवेळी पक्षाने शेखर गोरे यांना उमेदवारी दिली. तेव्हा दिलीपतात्यांनी पक्षनेतृत्वावर सडकून टीका केली होती. त्यानंतर इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतूनही त्यांनी अंग काढून घेतले होते. या दोन नेत्यांतील अबोला जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. मात्र शुक्रवारी जिल्हा बँकेत कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेल्या जयंतरावांना खूश करण्याची संधी दिलीपतात्यांनी सोडली नाही. जयंतराव ‘व्हिजनरी’ नेतृत्व असल्याचा उल्लेख करीत त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण दिले. राजारामबापू साखर कारखान्याचे पहिल्यांदा संचालक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी साडेतीन लाख रुपयांचा संगणक कारखान्यात बसवला होता. तेव्हा आम्ही इतके पैसे कशाला खर्च करायचे, असे म्हणत होतो. पण संगणक आल्यानंतर जयंतरावांनी संपूर्ण यंत्रणाच आधुनिक केली. राज्यातील बहुतांश साखर कारखाने आज संगणकीकृत झाले आहेत, असेही पाटील म्हणाले. नोटा बंदीमुळे जिल्हा बँक संकटात आहे. पण ही बँक बुडणार आहे, विलीनीकरण होणार आहे, असे कोणी अधिकारी सांगत असेल, तर त्याच्यावर खटला दाखल करू, असे सांगताना दिलीपतात्यांनी पॉज घेतला, पण साहेबांनी आपणाला शांत राहण्यास सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेवर आयकरचे छापे पडत आहेत. आमच्या बँकेचीही तपासणी झाली आहे. पण बँकेत कुठलीही भानगड नाही. भानगड झाली असेल तर ती पूर्वी. आता सारे काही व्यवस्थित सुरू आहे. बँकेच्या कारभारावर सर्व संचालक खूश आहेत, हे सांगण्यासही दिलीपतात्या विसरले नाहीत. बँकेच्या नूतनीकरणासाठी आपल्याला चांगला माणूस व चांगला हात हवा होता. जयंतरावांशिवाय चांगला हात कुठे आहे, त्यासाठी त्यांच्याहस्ते उद्घाटन केले, असे त्यांनी सांगितले. दिलीपतात्यांच्या स्तुतीवर अनेकदा जयंतरावांनाही हसू येत होते. त्यांनीही भाषणात दिलीपतात्यांच्या कारभाराचे कौतुक केले.(प्रतिनिधी)दिलीपतात्यांचा चष्मा : जयंतरावांना फिट्टभाषणावेळी दोन हजारच्या नोटेवरील रिझर्व्ह बँकेचे वचन जयंतरावांना वाचून दाखवायचे होते. त्यांनी डायसजवळ बसलेले रामदुर्ग यांचा चष्मा घेतला, पण त्या चष्म्यातूनही त्यांना ते वाचता आले नाही. शेवटी दिलीपतात्यांनी आपला चष्मा जयंतरावांना दिला. तो चष्मा घालताच, ‘बघा, दिलीपतात्यांचा चष्मा मला किती व्यवस्थित बसतो आहे’, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. जिल्हा बँकेत येणाऱ्या माणसाला अभिमान वाटावा, असे काम सुरू आहे. बँकेची व्यवस्था आधुनिक असावी, यासाठी दिलीपतात्या प्रयत्न करीत आहेत, असेही जयंतराव म्हणाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांतील दुरावा संपल्याचे चित्र होते.