शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जयंतराव-सदाभाऊ कबड्डी मैदानावर एकत्र : इस्लामपुरात स्पर्धेतून रंगला डाव-प्रतिडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:42 IST

इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना शह देऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सवंगडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. खोत आणि आमदार पाटील स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र आले असले तरी

ठळक मुद्देराजकीय चर्चेला उधाण

अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना शह देऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सवंगडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. खोत आणि आमदार पाटील स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र आले असले तरी, श्रेयवादासाठी मैदानावर मात्र डाव-प्रतिडाव आखले जात आहेत. त्यामुळे या स्पर्धेला राजकीय रंग चढला आहे.

इस्लामपूर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचे निमंत्रक सदाभाऊ खोत आहेत. आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या इस्लामपूर व्यायाम मंडळाचे खेळाडू प्रो-कबड्डीत चमकले आहेत. त्या खेळाडूंचे राष्ट्रीय प्रशिक्षक पोपट पाटील यांच्या सहकार्याने खोत यांनी राज्यस्तरीय स्पर्धा भरवून भाजपची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांची छायाचित्रे स्पर्धेच्या शासकीय जाहिरातीत वापरली आहेत. मात्र त्यात या विभागाचे लोकप्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील आणि नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना डावलले आहे. मात्र आमदार पाटील यांनी खिलाडूवृत्ती दाखवत, जेथे स्पर्धा होणार आहे, त्या मैदानाची पाहणी केली. तथापी आता या मैदानावर खेळापेक्षा राजकीय डाव-प्रतिडाव पहायला मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जयंतराव-सदाभाऊ एकत्रइस्लामपूर येथील एका विवाह समारंभात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत एकत्रित आले होते. एवढेच नव्हे, तर लग्नसमारंभानंतर जेवायलाही ते शेजारी-शेजारी बसले होते. या त्यांच्या एकत्रित येण्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलSadabhau Khotसदाभाउ खोत Sangliसांगली