शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

जयंतरावांचे आता ‘मिशन महापालिका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सत्ताधारी भाजपमधील नाराजीचा फायदा उठवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आता ‘मिशन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सत्ताधारी भाजपमधील नाराजीचा फायदा उठवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आता ‘मिशन महापालिका’ हाती घेतले आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या महापौरपदाच्या निवडीसाठी फोडफोडीचा ‘कार्यक्रम’ आखला असून, त्यासंदर्भात नुकत्याच तीन गुप्त बैठका झाल्या आहेत. ‘संधी’ शोधणाऱ्या भाजपमधील नगरसेवकांना त्यांनी हेरले आहे.

जयंत पाटील यांनी २००८ मध्ये महाआघाडीचा प्रयोग करून काँग्रेसच्या मदन पाटील गटाची सत्ता उलथवून लावली होती. मात्र पाच वर्षांतच अंतर्गत लाथाळ्यांमुळे महाआघाडीला पायउतार व्हावे लागले होते. ‘इस्लामपूरचे पार्सल इस्लामपूरला परत!’ असे हिणवले गेले. राज्यातील सत्तेच्या जोरावर ऑगस्ट २०१८ मध्ये भाजपने काठावरचे बहुमत मिळवत महापालिकेत कमळ फुलवले. त्यावेळी सांगलीत परतण्याचा जयंतरावांचा डाव पुन्हा हुकला होता.

महापाैरपद पहिली अडीच वर्षे ओबीसी महिलेसाठी राखीव होते. पुढील अडीच वर्षे ते खुले आहे. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. नेमकी हीच संधी साधून महापौर राष्ट्रवादीचा नव्हे, तर काँग्रेस किंवा भाजपचा करायचा, पण ‘आपले ऐकण्यातला’ असावा, यासाठी जयंतरावांचे डावपेच सुरू झाले आहेत. त्यासंदर्भात तीन गुप्त बैठका झाल्या आहेत.

राज्यात महाआघाडीचे सरकार असल्याने काँग्रेसचे सर्व गट जयंतरावांसोबत येतील, यासाठी जाळे टाकण्यात येत आहे. शिवाय सरकारी निधीचे गाजर आणि भविष्यातील समीकरणांची वाट दाखवून भाजपमधील नाराजांना वळवण्याची रणनीतीही आखली जात आहे. त्याद्वारे कुंपणावरील नगरसेवक फुटतील असा होरा बांधण्यात आला आहे.

महापाैरपदासाठी मदन पाटील गटाचे नाव पुढे करून लढत द्यायची किंवा भाजपमधील नाराजांना हाताशी धरून तत्कालीन महाआघाडीतील आपल्या गटाचा महापौर करून सत्तेचा सुकाणू हातात ठेवायचा, अशी खेळी खेळण्याचे नियोजन सुरू आहे.

-------------

बावडेकर, आवटी, सूर्यवंशी की संतोष पाटील?

भाजपमधून युवराज बावडेकर, निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी प्रबळ दावेदार आहेत. या तिघांचेही गट महाआघाडीसोबत होते. अंतर्गत संघर्षातून महापौरपदासाठी ते कोणाशीही हातमिळवणी करू शकतात किंवा तिन्ही गटांमध्ये साठमारी होऊ शकते. आवटी किंवा सूर्यवंशी यांच्याशी बोलणी फिसकटली तर बावडेकर हाताशी लागू शकतात. त्यांना खासदार संजयकाका पाटील यांचे पाठबळ असल्याने ‘करेक्ट कार्यक्रम’ होऊ शकतो, याचा अंदाज जयंतरावांना आहे. पक्षादेशाच्या अडसर आला तर काहींना अनुपस्थित ठेवून काँग्रेसमधील मदन पाटील गटाच्या संतोष पाटील यांचे नाव पुढे केले जाईल. हल्ली संतोष पाटील यांची जयंतरावांशी जवळीक वाढली आहेच!