शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न विधानसभेत मांडणार : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:56 IST

सार्वजनिक ग्रंथालयांना व्यंकाप्पा पत्की समितीच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, सर्वच ग्रंथालयांचे अनुदान २००४ च्या चौपट करावे, ग्रंथालय सेवकांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात यासह

ठळक मुद्देखानापूर तालुका ग्रंथालय संघाच्या शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन

विटा : सार्वजनिक ग्रंथालयांना व्यंकाप्पा पत्की समितीच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, सर्वच ग्रंथालयांचे अनुदान २००४ च्या चौपट करावे, ग्रंथालय सेवकांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात यासह ग्रंथालयांचे विविध प्रश्न विधानसभा अधिवेशनात मांडून ग्रंथालयांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करण्यास सरकारला भाग पाडू, असे आश्वासन राष्टवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिले.

खानापूर तालुका ग्रंथालय संघाच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांची भेट घेऊन, ग्रंथालयांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा अधिवेशनात पाठपुरावा करण्याची विनंती केली. यावेळी संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी ग्रंथालयांच्या विविध प्रलंबित मागण्यांची आ. पाटील यांना सविस्तर माहिती दिली.

अ‍ॅड. मुळीक म्हणाले, राज्य शासन १९८० पासून दर सहा वर्षांनी सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात दुप्पट वाढ करीत होते. २००४ नंतर २०१० च्या दरम्यान अनुदानात दुप्पट व २०१६ च्या दरम्यान २००४ च्या चौपट अनुदानात वाढ होणे आवश्यक असताना, २०१२ ला अनुदानात केवळ ५० टक्के वाढ करण्यात आली. त्यानंतर ग्रंथालय संघ कर्मचारी संघटनेने वेळोवेळी मागणी करूनही अनुदानात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही.

ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी ग्रंथालयांना मिळणाऱ्या अनुदान गाव तेथे गंथालय आदी विषयावर शिफारस करण्यासाठी शासनाने प्रभा राव व व्यंकाप्पा पत्की अशा दोन समित्या नेमल्या होत्या. मात्र या दोन्ही समित्यांच्या शिफारशी शासनाने अद्याप स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे ग्रंथालयांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे आ. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी आ. जयंत पाटील यांना ग्रंथालय संघाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आ. पाटील यांनी येत्या अधिवेशनात ग्रंथालयांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न संपुष्टात आणले जातील, अशी ग्वाही दिली.यावेळी विटा नगरवाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. संदीप मुळीक, ग्रंथपाल विक्रम चोथे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.विटा येथे ग्रंथालयांच्या विविध मागण्यांचे निवेदन संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याहस्ते राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना देण्यात आले. अ‍ॅड. संदीप मुळीक, विक्रम चोथे यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलkolhapurकोल्हापूर