शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Sangli Election : जयंत पाटलांनी पैसे नाही म्हणणे हास्यास्पद : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 16:29 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आमच्यावर पैशाचा आरोप करताना स्वत:कडे पैसे नाहीत म्हणणे हे हास्यास्पदच आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देजयंत पाटलांनी पैसे नाही म्हणणे हास्यास्पद : चंद्रकांत पाटीलअजून ईव्हीएम यंत्राबद्दल आरोप कसे झाले नाहीत?

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आमच्यावर पैशाचा आरोप करताना स्वत:कडे पैसे नाहीत म्हणणे हे हास्यास्पदच आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, सांगली महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे आमच्या पारदर्शी व प्रामाणिक धोरणांना मिळालेला कौल आहे. पदरात पराजय पडला म्हणून आता विरोधक काहीही आरोप करतील. भाजपने पैशाचा आणि बळाचा वापर केला, असा आरोप करताना अजून त्यांनी मतदान यंत्रांमधील घोटाळ्याचा आरोप कसा केला नाही, याचे आश्चर्य वाटते.

त्यांनी काही आरोप व टीका ठरविलेल्या आहेत. भाजपवाल्यांकडे पैसे आहेत आणि आमच्याकडे पैसे नसून झोळ्या आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी करणे म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे.सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अगोदरच आत्मविश्वास गमावला होता. स्वबळावर लढण्याबद्दल त्यांना शंका वाटत होती. म्हणूनच त्यांनी आघाडी केली.

सुरुवातीलाच आत्मविश्वास गमावल्यामुळे त्यांनी महापालिकासुद्धा गमावली. सत्तेत असणाऱ्या कॉँग्रेसबद्दल लोकांमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार झाले होते. दुसरीकडे आम्ही आ. सुधीर गाडगीळ यांच्यासारखा स्वच्छ चेहरा नेतृत्व म्हणून दिला. त्यामुळे लोकांनी भाजपच्या पारड्यात मते टाकली.

गेल्या काही दिवसांपासून गाडगीळ व आ. सुरेश खाडे यांनी शहरांमध्ये केलेल्या दर्जेदार रस्त्यांमुळेही लोकांचा आमच्यावर विश्वास बसला. मुस्लिमविरोधी, दलितविरोधी म्हणून आमच्यावर शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात आम्ही सर्वाधिक मुस्लिम व दलित उमेदवार दिले आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून आमची ओळख निर्माण झाली आहे.

आयाराम सगळीकडेच!पाटील म्हणाले की, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आयात उमेदवारांना घेऊन भाजपने निवडणूक लढविल्याचा आरोप विरोधकांनी केला. माध्यमांमध्येही त्यापद्धतीची प्रतिक्रिया उमटली, पण कार्पोरेट कंपन्या किंवा कोणत्याही क्षेत्रात चांगल्या माणसांना खेचण्याचा प्रयत्न होत असतो. भाजपने अशाच चांगल्या लोकांना खेचले आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेतले असते तर गोष्ट वेगळी होती.लोकसभेचा पेढा!विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नेत्यांनी आणलेल्या पेढ्यांच्या बॉक्समधील एक पेढा उचलून चंद्रकांत पाटील यांनी तो खासदार संजयकाका पाटील यांना भरविला. आगामी लोकसभेसाठी हा पेढा असल्याचे सांगून त्यांनी उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेची जबाबदारीही त्यांच्याकडे राहील, असेही सांगितले.

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलSangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूक