शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हाय प्रोफाईल कार्यकर्त्यांमुळे जयंत पाटील आले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:57 IST

इस्लामपूर आणि आष्टा पालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला गळती लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतदानाचा टक्का घसरला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते हाय प्रोफाईल राहणे पसंत करीत असल्याने सर्वसामान्य मतदार जयंतरावांपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देहाय प्रोफाईल कार्यकर्त्यांमुळे जयंत पाटील आले अडचणीतआगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा

अशोक पाटील इस्लामपूर : इस्लामपूर आणि आष्टा पालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला गळती लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतदानाचा टक्का घसरला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते हाय प्रोफाईल राहणे पसंत करीत असल्याने सर्वसामान्य मतदार जयंतरावांपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे आहेत.जयंत पाटील यांनी इस्लामपूर, आष्टा या शहरांच्या विकासाला गती दिली. ग्रामीण भागातील विकासाला निधी कमी पडू दिला नाही. त्याचबरोबर राजारामबापू उद्योग समूहातील संस्था सक्षम केल्या. या ठिकाणी नोकऱ्या देताना सर्वसामान्य बेरोजगारांचा विचार केला नाही. ज्याचा इस्लामपूर मतदारसंघाशी काहीही संबंध नाही, अशांना अधिकारी पदावर संधी दिली. या अधिकाऱ्यांनी आर्थिक स्वार्थ साधला.

याचाही परिणाम झाल्याचे दिसत आहे.गेल्या चार वर्षात भाजपच्या धोरणांविरोधात जयंत पाटील यांनी आंदोलने केली. इस्लामपूर शहरात आंदोलनावेळी हाय प्रोफाईल पदाधिकारी, कार्यकर्ते आलिशान वाहनांतून येऊन तोंडओळख परेड करण्यापलीकडे त्यांची कार्यपद्धती कधी पुढे सरकली नाही. तसेच काही नेते मतदार संघात आमदार पाटील यांच्या दौऱ्यावेळीच दिसतात. या नेत्यांना त्यांच्या गावातही जनमत नाही. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील युवा कार्यकर्त्यांची फळी आ. पाटील यांच्यापासून दुरावत चालली आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात पक्ष बांधणीसाठी संपर्क वाढविला आहे. त्याचबरोबर इस्लामपूर मतदार संघावरही आपले लक्ष केंद्रित केले आहे. गावा-गावातील बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी बैठका घेण्यावरही आ. पाटील यांनी भर दिला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांना वाळवा-शिराळ्यात मताधिक्य मिळाले. जोपर्यंत जयंत पाटील यांच्याजवळचे हाय प्रोफाईल कार्यकर्ते जनमानसात मिसळत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रवादीची ताकद वाढणार नाही, हे मात्र स्पष्टपणे दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालJayant Patilजयंत पाटीलsangli-pcसांगली