शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

महापालिकेत जयश्रीतार्इंचा शब्द अंतिम

By admin | Updated: October 20, 2015 23:49 IST

नगरसेवकांचे साकडे : विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन, मदनभाऊंच्या आठवणीने वातावरण भावूक

सांगली : काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांचा शब्द महापालिकेत अंतिम राहणार आहे. मंगळवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जयश्रीतार्इंची भेट घेऊन तशी ग्वाहीही दिली. यावेळी नगरसेवकांसह त्यांच्या कुटुंबियांनाही अश्रू अनावर झाले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी जयश्रीतार्इंनी नगरसेवकांना एकसंधपणे शहराच्या विकासाचे काम करावे, असा संदेश देतानाच, मदनभाऊंप्रमाणेच कार्यकर्त्यांना अंतर देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेत काँग्रेसअंतर्गत मदन पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. या गटाचे नेतृत्व कोण करणार?, असा प्रश्न होता. सोमवारी महापालिकेतील बैठकीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी जयश्रीतार्इंना साकडे घालण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी शोकसभा झाल्यानंतर सायंकाळी काँग्रेसचे ३० नगरसेवक विजय बंगल्यावर गेले. यावेळी महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, गटनेते किशोर जामदार, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी, हारूण शिकलगार, माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर यांच्यासह महिला नगरसेविकाही उपस्थित होत्या. यावेळी महापौर कांबळे म्हणाले की, मदनभाऊंनी कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम केले. त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांचा आधारच संपला आहे. कार्यकर्त्यांना मायेचे छत्र हवे आहे. आम्ही सर्व भाऊ एकत्र येऊन बहिणीकडे साकडे घालत आहोत. जिवात जीव असेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही राजकारणात सक्रिय व्हा, असे साकडेही त्यांनी घातले. महापालिकेत मदनभाऊंचा शब्द अंतिम होता. तसाच तुमचाही शब्द आमच्यासाठी प्रमाण असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. किशोर जामदार म्हणाले की, मदनभाऊंनी वारणा योजनेसह अनेक उपक्रम हाती घेतले होते. ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. महापालिकेचे नेतृत्व तुम्ही स्वीकारावे, असे त्यांनी सांगितले. नगरसेवकांच्या भावना ऐकून जयश्रीतार्इंनाही अश्रू अनावर झाले होते. नगरसेवकांनी एकसंध राहावे, असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. मदनभाऊंनी कार्यकर्त्यांवर प्रेम केले. तशीच वागणूक यापुढेही कार्यकर्त्यांना मिळेल. कोणालाही अंतर दिले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मदनभाऊंचा पुतळा : आज होणार निर्णयमहापालिकेच्यावतीने माजी मंत्री मदन पाटील यांचे स्मारक व पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात बुधवारी दुपारी एक वाजता महापौर विवेक कांबळे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेससह राष्ट्रवादी व स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. महापालिकेचे सर्व पदाधिकारी, तीन पक्षांचे गटनेते व प्रमुख नगरसेवकांची प्रशासनाच्या उपस्थितीत बैठक होईल. या बैठकीत जागा निश्चित होणार असल्याचे महापौर कांबळे यांनी सांगितले.कोरेंकडूनसांत्वन‘जनसुराज्य शक्ती’चे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे यांनी सायंकाळी जयश्रीताई पाटील यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी समित कदम उपस्थित होते.