शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जपानी संगीतप्रेमी शिकणार तंतुवाद्यनिर्मिती--संडे हटके बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 20:15 IST

सदानंद औंधे। मिरज : मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीची कला आता जपानी संगीतप्रेमी शिकणार आहेत. जपानमध्ये ध्रुपद सोसायटीतर्फे ९ ते १९ ...

ठळक मुद्देमिरजेतील कारागीरांना आमंत्रण । जागतिक पातळीवर कलेचा गौरव, परदेशात होणार पहिलीच कार्यशाळा

सदानंद औंधे।मिरज : मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीची कला आता जपानीसंगीतप्रेमी शिकणार आहेत. जपानमध्ये ध्रुपद सोसायटीतर्फे ९ ते १९ जुलैदरम्यान तंतुवाद्य निर्मिती कार्यशाळेसाठी मिरजेतील तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर व आतिक सतारमेकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. जपानमधील योकोसुका, कामाकुरा, निशीनोमिया या शहरात ही कार्यशाळा होत आहे. भारतीय तंतुवाद्य निर्मितीची परदेशात होणारी ही पहिलीच कार्यशाळा आहे.

तंतुवाद्य निर्मितीसाठी मिरजेची जगात ख्याती आहे. सुमारे दीडशे वर्षे येथे तंतुवाद्य निर्मितीचा व्यवसाय सुरू आहे. मिरजेतील तंतुवाद्यांना परदेशातही मागणी आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक गायक-वादक मिरजेतील वाद्यांना पसंती देतात. भारतीय शास्त्रीय संगीताची आवड असलेले परदेशी नागरिकही मिरजेतील वाद्यांची मागणी करतात.

मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीचा लौकिक जगभर पसरला आहे. त्यामुळे विविध देशातील संगीतप्रेमी नागरिकांना भारतीय तंतुवाद्यांविषयी कुतूहल, जिज्ञासा आहे. ही वाद्ये कशी तयार करतात, त्यांना जवारी कशी लावली जाते, यांची माहिती होण्यासाठी जपानमधील ध्रुपद सोसायटीतर्फे तंतुवाद्य निर्मितीच्या कार्यशाळेच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेमार्फत जपानमधील दोन शहरात होणाऱ्या तंतुवाद्यनिर्मिती कार्यशाळेत मिरजेतील मजीद सतारमेकर आणि आतिक सतारमेकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

ध्रुपद सोसायटी अनेक वर्षे जपानमधील संगीतप्रेमींना भारतीय संगीताचे शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या प्रमुख मारिको कटसुरा उत्तम गायिका आहेत. त्या उस्ताद फरिदोद्दीन डागर आणि डॉ. ऋत्त्विक संन्याल यांच्या शिष्या आहेत. त्यांच्या सहकारी गायिका नावो सुझुकी व माकिकाटो यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.जपानी संगीतप्रेमींसाठी पर्वणीदहा दिवसांच्या या कार्यशाळेत मजीद व आतिक सतारमेकर तंतुवाद्य कसे तयार केले जाते, त्याला तारा कशा बसवल्या जातात, विविध तंतुवाद्यांमध्ये काय फरक असतो, जवारी कशी काढली जाते, याची माहिती जपानी संगीतप्रेमींना प्रात्यक्षिकांसह देणार आहेत. गेल्या दीडशे वर्षांत तंतुवाद्यनिर्मिती परंपरेत परदेशात व जपानमध्ये होणारी ही पहिलीच कार्यशाळा असून, त्यामध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिरजेतील तंतुवाद्यनिर्माते मजीद व आतिक सतारमेकर यांना मिळाला आहे.मिरजेत तंतुवाद्य निर्मितीची दीडशे वर्षांची परंपरा आहे. येथील सतारमेकर कुटुंबियांचा यामध्ये विशेष लौकिक आहे. या कुटुंबातील मजिद सतारमेकर जपानमधील कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :musicसंगीतSangliसांगलीJapanजपान