शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील लाठीहल्याचा निषेध: सांगली जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद

By शरद जाधव | Updated: September 7, 2023 11:27 IST

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह जालना येथील लाठीहल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या सांगली जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ...

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह जालना येथील लाठीहल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या सांगली जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासूनच सांगली शहर आणि इतर भागातील संपूर्ण व्यवहार बंद आहेत. सांगली शहरात मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.सांगली शहरातील सर्व व्यवहार व वाहतूक बंद होती. पोलिसांकडून सर्व चौकात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इस्लामपूर, विटा, जत आणि आटपाडी येथील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. वैद्यकीय मदत मिळवण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.इस्लामपुरात सगळीकडे शुकशुकाट; सर्व व्यवहार ठप्पइस्लामपूर : इस्लामपूर शहरातील सर्व समाज बांधवांनी कडकडीत बंद पाळला. मुख्य बाजार पेठेसह बसस्थानक रस्ता, डॉ. आंबेडकर मार्ग, आझाद चौक, गांधी चौक, लाल चौक, गणेश भाजी मंडई, यल्लमा चौक, कचेरी चौक, महावीर चौक, जयहिंद चित्रमंदिर परिसर, मुख्य भाजी बाजार अशा सगळ्या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. येथील एस.टी. आगारातून परिस्थिती पाहून बस सोडण्यात येत होत्या. कोल्हापूर आणि कराड मार्गावरील सेवा सुरू होती. त्यानंतर ग्रामीण भागातील सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या.शिराळा शहर, तालुका कडकडीत बंद शिराळा : शिराळा शहर आणि तालुक्यात जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. काही गावांमध्ये या अगोदर बंद पाळण्यात आल्याने याठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. एस टी वाहतूक ही बंद ठेवण्यात आली आहे. यावेळी संघटनांमार्फत तहसीलदार शामला खोत पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणjalna-acजालना