शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचे नेते जयपाल फराटे यांचे निधन, आयुष्यभर संघटनेशी एकनिष्ठ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 15:45 IST

विदर्भ-मराठवाड्यात असणारी शरद जोशी यांची शेतकरी संघटना ऊस आंदोलनाद्वारे पश्चिम महाराष्ट्रात रुजवण्यात जयपालअण्णांचा मोठा वाटा

कसबे डिग्रज (जि.सांगली) : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी स्थापना केलेल्या शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष जयपाल सिद्धाप्पा फराटे (वय ८६, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) यांचे सोमवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.‘जयपालअण्णा’ या नावाने ते परिचित होते. विदर्भ-मराठवाड्यात असणारी शरद जोशी यांची शेतकरी संघटना ऊस आंदोलनाद्वारे पश्चिम महाराष्ट्रात रुजवण्यात जयपालअण्णांचा मोठा वाटा होता. शेतकरी संघटनेच्या सांगलीतील अधिवेशनात शरद जोशी यांनी त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली होती. त्या काळात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस दर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे सर्व श्रेय त्यांना जाते. ऊस दर आंदोलनात मौजे डिग्रज येथे पोलिसांनी आंदोलकांना केलेल्या मारहाणीचा प्रश्न त्यांनी उचलून धरला होता. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते.माजी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, वामनराव चटप, पाशा पटेल आदी शेतकरी संघटनेचे नेत्यांमध्ये जयपालअण्णांना मोठा मान होता. संघटनेत ते कार्यरत असताना त्यांना विविध पक्षांकडून पदांची आमिषे दाखविण्यात आली होती, पण शेतकरी संघटनेच्या विचारांपासून ते कधीच दूर गेले नाहीत. आयुष्यभर ते संघटनेशी एकनिष्ठ राहिले.

टॅग्स :Sangliसांगली