Sambhaji Bhide ( Marathi News ) : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. संभाजी भिडे यांनीही यावरुन प्रतिक्रिया दिली आहे. भिडे यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिले आहे.
संभाजी भिडे यांनी आज पत्रकाप परिषद घेतली. यावेळी त्यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना संभाजी भिडे म्हणाले,संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे, वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचल आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे, असंही भिडे गुरुजी म्हणाले.
"आजही माझ्या डोळ्यात पाणी अन् अंगावर काटे उभे राहतात.."; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?
'काहींना माझे मत पटणार नाही'
"माणसं एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात, निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे. याचे धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथेच पाहिजे. स्वार्थासाठी कशीही मत बदलणारी माणसांना माझे मत पटणार नाही. पण त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेले नाही. आत्ताचे व्याख्याते आपल्या वक्तव्यातून महाराजांचा उपयोग आपल्या आपल्या सोयीसाठी वापरतात. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मी नव्हते ते फक्त हिंदुत्ववादी होते, असंही संभाजी भिडे म्हणाले.
कुणाल कामरा प्रकरणावरुन भिडे संतप्त
दरम्यान, दोन दिवसापूर्वी कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एका गाण्यात गद्दार असा उल्लेख केला. यावर भिडे गुरुजी संतप्त झाले. यावर बोलताना संभाजी भिडे म्हणाले, विधासभेत जो धुडगूस चाललाय हे लोकशाहीला शोभणारे नाही. ज्यांनी ज्यांनी हा निचपणा केलाय ते सगळे देशद्रोही आहेत, आर आर आबांनी डान्स बार बंद केले. मात्र त्याच डान्स बारचे सावत्र भावंडे म्हणजे कामरा नावाच्या पद्धतीची हॉटेल चालवणे आहे, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली.