शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जत मतदारसंघात गाजणार पीक विमा, ‘म्हैसाळ’चा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:45 IST

या वर्षाचा खरीप हंगामातील पीकविमा मिळालेला नाही. ‘म्हैसाळ’च्या पाण्याचा प्रश्नही पाच वर्षात गाजला असून, विधानसभा निवडणुकीत याच प्रश्नावर प्रचार रंगणार आहे.

ठळक मुद्दे विधानसभा निवडणूक : रब्बी हंगामातील ६९ गावे नुकसान भरपाईपासून वंचित

गजानन पाटील ।संख : राज्य शासनाने पिकांना व फळबागांना नुकसानभरपाई दिली. जत तालुक्यातील खरीप हंगामातील ५४ गावांना भरपाई मिळाली आहे. शासनाची दप्तरदिरंगाई व आचारसंहितेमुळे दुष्काळी रब्बी हंगामातील ६९ गावांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. या वर्षाचा खरीप हंगामातील पीकविमा मिळालेला नाही. ‘म्हैसाळ’च्या पाण्याचा प्रश्नही पाच वर्षात गाजला असून, विधानसभा निवडणुकीत याच प्रश्नावर प्रचार रंगणार आहे.

तालुक्यातील खरीप हंगामात ५४ गावे व रब्बी हंगामामध्ये ६९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी तालुक्यात २६५.४४ मि.मी. पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने सुरुवातीला थोड्याप्रमाणात हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या. नंतर पाऊस न झाल्याने हाती काहीच लागले नाही. हंगाम पूर्णपणे वाया गेला. परतीच्या मान्सून पावसाने दडी दिल्याने रब्बी हंगाम वाया गेला आहे. डाळिंब, द्राक्षे या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्य सरकारने तालुका दुष्काळी म्हणून जाहीर केला. खरीप हंगामातील पिकासाठी नुकसान भरपाईची घोषणा केली. फळपिकासाठी हेक्टरी १८ हजार व इतर पिकासाठी हेक्टरी सहा हजार ८०० रुपये नुकसानभरपाई दिली आहे. सरकारने घोषणा केल्यानंतर खरीप गावांना नुकसानीचे वाटप केले. मात्र रब्बीचा हंगाम वाया जाऊनसुद्धा नुकसानभरपाई मिळाली नाही. प्रशासनाने महसूल आणि कृषी विभागाचा अहवाल मागवून घेतलेला नाही. हंगाम संपून तीन महिने झाले तरी, शासनाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिने संपले तरीसुद्धा पावसाने दडी दिली आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे.

रब्बी हंगामातील कुंभारी गाव वगळता बाकीच्या ६८ गावांना मे महिन्यात टँकर सुरू होते. सध्या ६३ टॅँकर व १३ चारा छावण्या सुरू आहेत. असे असतानाही रब्बी हंगामातील गावांना दुष्काळी नुकसानभरपाई मिळालेली नाही. जत पूर्व भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळाले नसल्यामुळे त्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक आहेत.

रब्बी हंगामातील अमृतवाडी, जत, देवनाळ, मेंढेगिरी, शेगाव, उमराणी, खोजनवाडी, कुडणूर, निगडी खुर्द, बागलवाडी, वळसंग, व्हसपेठ, कराजगी, मायथळ, घोलेश्वर, कुणीकोणूर, संख, खंडनाळ, गोंधळेवाडी, तिकोंडी, करेवाडी, पारधेवस्ती, कोणबगी, मोटेवाडी (को), अंकलगी, उमदी, कुलाळवाडी, कागनरी, आसंगी तुर्क, जालिहाळ खुर्द, सिध्दनाथ, कागनरी, मोटेवाडी (आसंगी), धुळकरवाडी, मोरबगी, जालिहाळ बुद्रुक, दरीबडची, लमाणतांडा (दरीबडची), करजगी, सुसलाद, बेळोंडगी, सोनलगी, माणिकनाळ अक्कळवाडी, बोर्गी खुुर्द, विठ्ठलवाडी, गुुुलगुंजनाळ, बालगाव, हळ्ळी, उटगी, निगडी (बुु), लमाणतांडा (उटगी), गिरगाव, लवंगा, रेवनाळ, काशिलिंगवाडी, कुंभारी, मुचंडी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, शेड्याळ, रावळगुुंडवाडी, उंटवाडी, सोरडी, गुड्डापूर, दरीकोणूर, आसंगी ही गावे सवलतींपासून वंचित आहेत. सध्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीमध्ये शासनाकडून मिळालेल्या दुष्काळी सवलती व पीक विमा या मुद्द्यांची चर्चा रंगणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही पोकळचतालुक्यातील सरपंचांच्या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांना रब्बी हंगामातील गावांना नुकसान भरपाईची मागणी केलेली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसानभरपाई देण्याचे नियोजन केले आहे, असे सांगितले होते. परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

खरीप हंगामातील पीक विमा अधांतरीबाजरी, मका, मूग, उडीद, तूर, भुईमूग या पिकांचा व डाळिंब फळबागेचा पीकविमा बजाज कंपनीकडे भरला आहे. खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. डाळिंब पीक पाणी नसल्याने व तेल्या रोगामुळे गेले आहे. परंतु पीक विमा मिळालेला नाही. हा मुद्दा निवडणुकीत चर्चेला जाणार आहे.

 

पाण्याअभावी रब्बी हंगाम वाया गेला आहे. पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने रब्बी हंगामातील गावांना नुकसानभरपाई देणे गरजेचे होते.- तुकाराम महाराज, संख

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारणSangliसांगली