शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात सहायक फौजदाराला मारहाण-रंगपंचमीत हुल्लडबाजी : शासकीय कामात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:47 IST

रंगपंचमी खेळताना आरडाओरडा करून हुल्लडबाजी करणाऱ्या युवकास पकडणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास कानाखाली मारून धक्काबुक्की करण्याचा प्रकार सोमवारी इस्लामपुरात घडला. याप्रकरणी अभिजित अजितकुमार शिंदे

ठळक मुद्देसोमवारी रंगपंचमी असल्याने पोलीस निरीक्षक एन. एस. देशमुख यांच्यासमवेत भरते व इतर कर्मचारी शहरातून गस्त घालत होते

इस्लामपूर : रंगपंचमी खेळताना आरडाओरडा करून हुल्लडबाजी करणाऱ्या युवकास पकडणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास कानाखाली मारून धक्काबुक्की करण्याचा प्रकार सोमवारी इस्लामपुरात घडला. याप्रकरणी अभिजित अजितकुमार शिंदे (वय २६, रा. अभियंतानगर, इस्लामपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने सहायक पोलीस निरीक्षक गणेशप्रसाद मुरलीधर भरते यांना मारहाण केली.

सोमवारी रंगपंचमी असल्याने पोलीस निरीक्षक एन. एस. देशमुख यांच्यासमवेत भरते व इतर कर्मचारी शहरातून गस्त घालत होते. बसस्थानक परिसरातील अहिंसा चौकात काही युवक रंगपंचमी खेळताना आरडाओरड करत हुल्लडबाजी करत होते. रस्त्याने येणाºया-जाणाºया लोकांच्या अंगावर रंग टाकत होते. हा प्रकार पाहून पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यावेळी अभिजित शिंदे हा त्याच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० बीके ४१) आरडाओरडा करीत होता. सहायक पोलीस निरीक्षक भरते यांनी त्याच्याकडे वाहन परवाना आणि कागदपत्राबाबत विचारणा केली. शिंदे याने कागदपत्रे नाहीत, परवाना डुप्लिकेट आहे, असे सांगून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर पथक त्याला वाहनासह पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना, काही अंतरावर अभिजित शिंदे याने सहायक पोलीस निरीक्षक भरते यांच्याशी वादावादी सुरु केली. त्याने भरते यांच्या कानाखाली मारून धक्काबुक्कीही केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गणेशप्रसाद भरते यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.पाठलाग करून पकडलेभरते यांना मारहाण करून शिंदे पळून जाऊ लागला. यावेळी इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून पोलीस कर्मचाºयास मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPolice Stationपोलीस ठाणे