शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

देशातील अनियंत्रित विमान धावपट्ट्यांची चौकशी, बारामतीतील दुर्घटनेचा लवकरच अहवाल - मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 00:26 IST

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीत आले होते. यावेळी ते माध्यमाशी बोलत होते. बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर देशातील अनियंत्रित क्लब आणि धावपट्ट्यांची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत अशा अनियंत्रित धावपट्टयांच्या चौकशी डीजीसीकडून सुरू असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगलीत दिली.केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीत आले होते. यावेळी ते माध्यमाशी बोलत होते. बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेबाबत ते म्हणाले की, विमान अपघातानंतर एडीसीएची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली होती. विमानाचा ब्लॅक बाॅक्सही हस्तगत केला आहे. त्याचा डेटा डाऊनलोड करण्याचे काम सुरू आहे. बारामतीची धावपट्टी ही आपल्या विभागाकडे नव्हती. त्या ठिकाणी फ्लाईंग क्लब व प्रशिक्षण केंद्र चालत होते.गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ती वापरात होती. शरद पवार, अजितदादाही या धावपट्टीचा वापर करत होते. ही घटना का घडली, त्याची कारणे काय याचा खुलासा अहवालानंतर होईल. देशात अनेक ठिकाणी अनियंत्रित धावपट्ट्या आहेत. त्याची माहिती डीजीसीकडून घेतले जात आहे. या धावपट्टीची चौकशी करून भविष्यात अपघाताचे प्रकार घढणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या घातपाताचा दावा राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळून लावला. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास आपली यंत्रणा करत आहे. त्यामुळे आपल्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा की, बाहेरच्या यंत्रणेवर? चौकशी अहवालानंतरच यावर बोलणे संयुक्तिक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.कोण काय बोलते, याला अर्थ नाहीअजितदादांच्या विमान अपघातामागे घातपाताची शंका घेतली जात असल्याबाबत मोहोळ म्हणाले की, अजितदादांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अजून डिजीसीचा अधिकृत अहवाल यायचा आहे. त्यामुळे कोण काय सांगते, काय बोलतो, याला अर्थ नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला. अजितदादांच्या जाण्याचा दुःख असून या घटनेची चौकशी चालू आहे. याच लवकरच अहवाल येईल, असेही स्पष्ट केले.

टॅग्स :AirportविमानतळBaramatiबारामतीGovernmentसरकार