शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: आटपाडी सूतगिरणी व्यवहाराची चौकशी सुरु, बँकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांना प्रकरण भोवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 18:00 IST

आटपाडीतील ४० कोटी रुपयांची बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणीची अवघ्या १४ कोटी रुपयांत विक्री

सांगली : आटपाडीतील ४० कोटी रुपयांची बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी अवघ्या १४ कोटी रुपयांत विकण्याच्या प्रकरणाची चौकशी शासनामार्फत सुरु करण्याचे आदेश सहकार विभागाने बुधवारी चौकशी समितीला दिले. सध्या बँकेत सुरु असलेल्या चौकशीमध्ये या प्रकरणाचा समावेश करुन त्याचा अहवाल येत्या २८ फेब्रुवारीस सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.आटपाडीतील सूतगिरणीच्या व्यवहार बाबत यापूर्वीच शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने बँकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. शासकीय देण्यांचा विचार न करता हा व्यवहार केल्यामुळे महामंडळाने नाराजी व्यक्त केली होती. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळानेही हा व्यवहार चुकीचा झाल्याबाबत स्षष्ट केले आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी आटपाडीतील या व्यवहाराची ही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली होती. त्याची दखल घेत सहकार विभागाने चौकशीचे आदेश दिले. सहकार विभागाचे अपर आयुक्त ज्ञानदेव मुकणे यांनी बुधवारी याबाबतचे आदेश काढले.सध्या जिल्हा बँकेत जुन्या संचालक मंडळाच्या काळातील व्यवहारांची चौकशी सुरु आहे. या चौकशी बरोबरच आटपाडीच्या सूतगिरणी व्यवहाराची चौकशी करण्यात यावी. २८ फेब्रुवारीस त्यांचा अहवाल सादर करावा, असे पत्रात म्हटले आहे.आटपाडीचे प्रकरण अडचणीचा विषयआटपाडीतील सूतगिरणीच्या व्यवहारामुळे बँकेच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतः आजी-माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे प्रकरण भोवण्याची शक्यता आहे.या प्रकरणांची चौकशी दुसऱ्या टप्प्यातबँकेकडून सरफेसी कायद्यांतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, कंपनी व महिला बचत गटाचे ६० कोटींचे कर्ज निर्लेखित करणे, तत्कालीन संचालकांच्या कारखान्यास ३२ कोटी रुपयांचे कर्ज शिफारस नसताना देणे, स्वप्नपूर्ती शुगर्स लिमिटेड कारखान्यास चुकीच्या पद्धतीने २३ कोटी रुपये कर्ज वाटप, २१ तांत्रिक पदांची बोगस कागदपत्रांच्या आधारे भरती आदींबाबत तक्रार केली होती. या प्रकरणांच्या चौकशीचा दुसरा टप्पा सुरु आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक