शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

कवठेएकंदच्या शाळांना आंतरराष्ट्रीय मान्यता : जिल्हा परिषदेच्या शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:49 IST

कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेची आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी निवड झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्राथमिक अहवालानुसार ही निवड

ठळक मुद्दे शैक्षणिक गुणवत्ता आणि लोकसहभागातून मिळाले मोठे यश

प्रदीप पोतदार ।कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेची आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी निवड झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्राथमिक अहवालानुसार ही निवड झाल्याचे पत्र देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, सातत्यपूर्ण पटसंख्या, कौशल्यपूर्ण अध्यापक वर्ग, शैक्षणिक कार्यात लोकांचा उत्स्फूर्त सहभाग, शैक्षणिक उठावातून भरीव कामगिरी यामुळेच जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा क्र. १ व जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा क्र. २ या शाळांना आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी मान्यता प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीकडून गेल्या वर्षभरात विविध निकषांवर वेगवेगळ्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कवठेएकंद जिल्हा परिषद शाळांचे सादरीकरण चांगल्याप्रकारे झाले होते. जिल्ह्यातील चार शाळा पात्र ठरल्या होत्या. नुकतीच महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पाहणी पथकाने भेट देऊन स्थानिक पातळीवरील अनेक घटकांची पाहणी केली. विद्यार्थी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महिला, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्याशी संवाद साधून मुलाखती घेतल्या. दरम्यान, येथील भौगोलिक स्थिती, भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी संख्या, लोकसहभाग, दळणवळण याबाबतीत मूल्यमापन केले. याअनुषंगाने २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयइबी) अस्थायी संलग्नता मिळाली असून, पूर्व प्राथमिक ते चौथीची मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक शिक्षकांना प्रशिक्षण व माहिती देण्यात येणार आहे.लोकसहभागातून इमारतसर्व शिक्षा अभियानांतर्गत कवठे एकंद येथे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा इमारत उभारण्यात आली आहे. सुमारे २९ लाख रुपये शासकीय अनुदानाबरोबर सुमारे ३४ लाख रुपयांची लोकवर्गणी संकलित करून गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटविला.या आहेत सुविधा...तीनमजली टोलेजंग इमारत गावच्या शैक्षणिक सुविधेसाठी सज्ज आहे. विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हरांडा व सुरक्षितरित्या ग्रील, ग्रॅनाईट फरशी, आकर्षक रंगरंगोटी यामुळे देखणे स्वरूप इमारतीस प्राप्त झाले आहे. सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल वर्ग, संरक्षक भिंत, सुलभ शौचालय, बाथरूमसह स्वच्छ पाणी पुरवठा सोय अशी कामे प्रस्तावित आहेत.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक