शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी सांगलीत रंगणार आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 20:09 IST

अशोक कामटे स्मृती फौंडेशनच्यावतीने आयोजन

शीतल पाटील, सांगली: शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशनच्यावतीने सांगलीत रविवार २६ रोजी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती मॅरेथॉनचे अध्यक्ष समित कदम यांनी पत्रकार बैठकीत दिली. या स्पर्धा पाच व २१ किलोमीटर या दोन गटात असून देश-विदेशातील खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ते म्हणाले, जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या शहीद मॅरेथॉनचे दहावे पर्व आहे. विश्रामबाग चौकातून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

या स्पर्धेसाठी २१ किलोमीटरसाठी विश्रामबाग ते विजयनगर ते मिशन हॉस्पिटल चौकातून परत विश्रामबाग, राम मंदिर, काँग्रेस भवन, जुना स्टेशन चौक, कापडपेठ, टिळक रोड, आयर्विन पुलापासून परत याच रस्त्याने विश्रामबागपर्यंतचा मार्ग असणार आहे. तर पाच किलोमीटरसाठी अशोक कामटे चौक ते राममंदिर चौक परत विश्रामबाग चौक असा मार्ग असणार आहे.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह दिल्ली, लखनऊ, चंदीगड, जयपूर, अहमदाबाद, सूरत, बेंगलोर, अथणी, विजयपूर, केरळसह केनिया, इथोपिया देशातील स्पर्धकही सहभागी होणार आहेत. स्पर्धकांना प्रोत्साहनासाठी झांज-ढोल पथक असणार आहेत. स्पर्धेच्या मदतीसाठी विविध शाळा, संघटना, सामाजिक संस्था व मंडळांनी सहकार्य केल्याचे कदम यांनी सांगितले.

यावेळी डॉ. चंद्रशेखर हळिंगळे, भूषण चिखली, श्वेता चिखली, प्रदीप सुतार, सुधीर भगत, विरेन हळींगळे, दीपक पाटील, योगेश रोकडे, पवन कुंभार, देवीदास चव्हाण, संतोष जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली