शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

Maharashtra Vidhan Sabha 2019 : जतमध्ये बंडखोरांची स्वतंत्र आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 15:16 IST

जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भाजपमधील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार आमदार विलासराव जगताप व काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत याना शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजतमध्ये बंडखोरांची स्वतंत्र आघाडीनिशिकांत पाटील यांचे बंड

जत : जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भाजपमधील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार आमदार विलासराव जगताप व काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत याना शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.भाजपने आमदार जगताप आणि काँग्रेसने सावंत यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर युती आणि आघाडीतील बंडखोरी उफाळून आली आहे. जत तालुका स्वाभिमानी आघाडीची स्थापना करण्यात आली. या आघाडीचे अपक्ष उमेदवार म्हणून डॉ. आरळी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दि. ४ आॅक्टोबर रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. बैठकीस बालगाव (ता. जत) येथील गुरुदेवाश्रम मठाचे मठाधिपती अमृतानंद महास्वामी, भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती तम्मनगौडा रवी-पाटील, माजी सभापती प्रकाश जमदाडे, प्रभाकर जाधव, शिवाजीराव ताड, संजय तेली, सोमनिंग बोरामणी व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बी. ए. धोडमणी, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, सुरेश शिंदे, रमेश पाटील, मन्सूर खतीब, जे. के. माळी, लक्ष्मण एडके, आप्पासाहेब पवार, स्वप्नील शिंदे, शिवाजी शिंदे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते बसवराज पाटील, सुभाष पाटील, देयगोंडा बिराजदार, माजी आमदार मधुकर कांबळे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, वंचित बहुजन आघाडीचे अशोक बन्नेनवार, सी. आर. सांगलीकर, यशवंत हिप्परकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार असे प्रमुख ३२ कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.निशिकांत पाटील यांचे बंडइस्लामपूर : इस्लामपूरविधानसभा मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी लढण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील पक्षातर्फे एक आणि अपक्ष एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिली.

ते म्हणाले की, जिल्ह्याला यशस्वी बंडखोरीची परंपरा आहे. शिवाजीराव देशमुख, पतंगराव कदम, संपतराव देशमुख, शिवाजीराव नाईक, विलासराव शिंदे, अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख अशा दिग्गज नेत्यांनी बंडखोरी यशस्वी करतच राजकीय कारकीर्द सुरू केली. हा सांगली जिल्ह्याचा इतिहास आहे. या सर्वांनी जनता आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत बंडखोरी केली होती. हीच परंपरा इस्लामपूर मतदार संघातही जपली जाईल.पाटील म्हणाले की, या मतदार संघातून सलग पाचवेळा भाजपचे उमेदवार लढले आहेत. त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार ही जागा भाजपलाच मिळायला हवी होती. मात्र हे घडले नाही. पण गेल्या तीन वर्षांच्या कामातून एकमेकांशी जपलेला जिव्हाळा लढण्याची उमेद वाढविणारा आहे.  यावेळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, धैर्यशील मोेरे, चंद्रकांत पाटील, मधुकर हुबाले उपस्थित होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगलीjat-acजाटislampur-acइस्लामपूर