शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरात अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 13:01 IST

water shortage Sangli-सांगली शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. कमी पाणी उपसा, काही ठिकाणी ड्रेनेजमुळे तुटलेल्या जलवाहिन्या यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

ठळक मुद्देसांगली शहरात अनेक भागात अपुरा पाणीपुरवठानागरिकांत नाराजी : मोटारींचा वापर वाढला

सांगली : शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. कमी पाणी उपसा, काही ठिकाणी ड्रेनेजमुळे तुटलेल्या जलवाहिन्या यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.सांगली शहरात गावभाग, खणभाग, शंभर फुटी रोड, संजयनगर, चिंतामणीनगर, पंचशीलनगर, शिवोदयनगर, लक्ष्मीनगर, अजिंक्यनगर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गावठाणातील ड्रेनेजचे काम पूर्ण झाले असले तरी त्याठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. पहिल्या मजल्यावरही पाणी जात नसल्याने नागरिकांना पाणी साठवण करता येत नाही.शहराच्या उत्तरेकडील भागात माधवनगरजवळील उपनगरांमध्ये अनेकठिकाणी ड्रेनेजसाठी खोदाई केल्याने जलवाहिन्या फुटल्या आहेत. ठेकेदाराकडील कामगारांकडन त्याची दुरुस्ती व्यवस्थित होत नाही. त्यामुळे रस्ते मुरुमाने भरल्यानंतर जलवाहिन्या पुन्हा फुटत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ज्या भागात जलवाहिन्यांना अडचण नाही, अशा भागात पाणीपुरवठा विभागामार्फत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे.महापालिकेकडे यंत्रणा अपुरीमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सध्या अपुरी यंत्रणा आहे. कमी कर्मचारी असल्याने दुरुस्तीची कामे तातडीने होत नाहीत. याशिवाय पाण्याचे टँकरही कमी असल्याने पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा करणेही मुश्कील आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गावभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. कुंभारखिंडीजवळ व्हॉल्व लिकेज असल्याचे सांगितले जात असले तरी त्याची दुरुस्ती तातडीने होत नाही. नागरिकांनी किती दिवस हा त्रास सहन करायचा- संजय चव्हाण,नागरिक, गावभाग

टॅग्स :water shortageपाणीकपातMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली