उपसंपादकासाठी सूचना : तहसीलदार ऋषीकेत शेळके - नाव तपासणे. दोन ठिकाणी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST2021-04-12T04:24:14+5:302021-04-12T04:24:14+5:30

फोटो - ११०४२०२१-विटा-रक्तदान शिबिर : विटा येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी ...

Instructions for Deputy Editor: Tehsildar Rishiket Shelke - Check the name. Is in two places. | उपसंपादकासाठी सूचना : तहसीलदार ऋषीकेत शेळके - नाव तपासणे. दोन ठिकाणी आहे.

उपसंपादकासाठी सूचना : तहसीलदार ऋषीकेत शेळके - नाव तपासणे. दोन ठिकाणी आहे.

फोटो - ११०४२०२१-विटा-रक्तदान शिबिर : विटा येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी रक्तदात्यांना प्रांताधिकारी संतोष भोर व तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार विटा येथे महसूल प्रशासनाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

खानापूर तालुक्यातील पोलीस पाटील, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी संतोष भोर व तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिविक्षाधीन नायब तहसीलदार प्रतीक्षा भुते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे उपस्थित होते. सांगलीच्या एमएसआय रक्तपेढीच्या वैद्यकीय पथकाने रक्त संकलन केले.

Web Title: Instructions for Deputy Editor: Tehsildar Rishiket Shelke - Check the name. Is in two places.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.