शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

१५० वर्षांची परंपरा, कागदी लगद्याची देखणी मूर्ती; सांगलीत चोर गणपतीची प्रतिष्ठापना, का पडलं असं नाव.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:24 IST

सांगली : सांगलीमध्ये श्री गणपती पंचायतन संस्थानच्या वतीने दरवर्षी गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा ...

सांगली : सांगलीमध्ये श्री गणपती पंचायतन संस्थानच्या वतीने दरवर्षी गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. यंदाची रविवारी विधीपूर्वक त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्याच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.चोर गणपतीच्या प्रतिष्ठापनेची परंपरा सुमारे १५० वर्षांहून अधिक जुनी आहे. त्याचे आगमन अतिशय गुप्तपणे होते, म्हणूनच त्याला 'चोर गणपती' असे नाव पडले आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला त्याची स्थापना होते. कागदाच्या लगद्यापासून बनवलेला हा पर्यावरणपूरक गणपती आहे. त्याचे विसर्जन केले जात नाही. भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच ऋषीपंचमीला विसर्जन विधी झाल्यानंतर तो पुन्हा मूळ ठिकाणी परत ठेवला जातो. पुढील वर्षी पुन्हा प्रतिष्ठापना केली जाते. चोर गणपतीच्या आगमनानंतर पंचायतनच्या गणेशोत्सव सोहळ्यास प्रारंभ होतो. माजी संस्थानिक श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी या परंपरेला सुरुवात केली होती. रविवारी गणेश मंदिरात विधिपूर्वक त्याची प्रतिष्ठापना झाली. उत्सवानिमित्त मंदिरामध्ये विशेष सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त दरबार हॉलचीही विशेष सजावट करण्यात आली आहे.