शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

वसंतदादा कारखान्यात तपासणी--साडेसात कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 00:25 IST

साखर चोरी प्रकरण : उत्पादन शुल्क विभागाकडून मागविला खुलासा

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील सीलबंद गोदामातून चोरी झालेल्या तीन कोटी ३0 लाख रुपयांच्या साखर चोरीप्रकरणी गुरुवारी संजयनगर पोलिसांनी कारखान्यात जाऊन तपासणी केली. कारखाना व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडून सुरक्षेच्या बाबतीत बेफिकिरी झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी प्रश्नावली तयार करून केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यावर खुलासा करण्याची सूचना दिली आहे. थकीत अबकारी करापोटी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने सील केलेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील गोदामातून तीन कोटी ३0 लाखांची साखर चोरीस गेली आहे. विभागाच्या अधीक्षक उषा मौंदेकर यांनी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, चीफ केमिस्ट आणि संजयनगर पोलिसांत रीतसर तक्रार दिली आहे. याप्रकरणी आता तपासाला गती मिळाली आहे. पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, उपनिरीक्षक शिल्पा दुथडे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी कारखान्यात जाऊन, ज्या गोदामातून साखर लंपास झाली आहे, तिथे पाहणी केली. कारखाना प्रशासनातील काही अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. संशयित कमलाकार गुटे-पाटील, चीफ केमिस्ट व्ही. डी. चव्हाण व गोदाम किपर एस. डी. पाटील यांच्याकडे साखर चोरीच्या काळात कोणती ड्यूटी होती? ते कारखान्यात हजर होते का? यासंदर्भातील रजिस्टर सादर करण्याची मागणी केली आहे. जप्त केलेली साखर सील करून गोदामात ठेवली होती. याठिकाणी रखवालदाराची नियुक्ती केली होती का? सीसीटीव्ही कॅमेरा आहे का? या अनुषंगाने सर्व माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. साखर स्थलांतर : नोंद आहे का?पावसाचे पाणी गोदामात शिरल्याने साखरेची पोती अन्य गोदामात स्थलांतरित केल्याचा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे. यावर पोलिसांनी, कारखाना प्रशासनाला तशी नोंद केली आहे का, याची विचारणा केली. तसेच स्थलांतर करण्यापूर्वी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेतली होती का? याचीही माहिती पोलिस घेत आहेत. साखर दुसऱ्या गोदामात स्थलांतर केली असेल, तर साखरेची चोरी झाली आहे असे म्हणता येणार नाही. मात्र, गोदामाचे सील फोडणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे याच्या मुळापर्यंत जाऊन तपास करावा लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.साडेसात कोटींची थकबाकीमिरज : केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने साडेसात कोटी रुपये उत्पादन शुल्क वसुलीसाठी वसंतदादा कारखान्याची ३५ हजार क्विंटल साखर ताब्यात घेतली आहे. उत्पादन शुल्क भरणा करीत नसल्याने २०१४ पासून गेली तीन वर्षे उत्पादन शुल्क विभाग वसुलीसाठी कारखान्याच्या साखर गोदामांना सील ठोकत आहे. साखर कारखान्याकडून साखर उत्पादनावर प्रति टन १९५० रुपये उत्पादन शुल्क वसूल करण्यात येते. प्रति टन ९५० रुपये अबकारी शुल्कात फेब्रुवारीपासून एक हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने साखर उत्पादनापासून उत्पादन शुल्क विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी दोन कोटी ३५ लाख रुपये अबकारी कर वसुलीसाठी वसंतदादा कारखान्यात १६ हजार क्विंटल साखरेच्या गोदामास सील ठोकण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी नवीन साखर गोदामे सील करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना पूर्वी ताब्यात घेतलेल्या गोदामातील साखर हलविल्याचे आढळले.थकीत अबकारी कराची सव्वादोन कोटी रुपये रक्कम कारखान्याने गतवर्षी जमा केली. मात्र, चालू वर्षाची साडेसात कोटी रुपये अबकारी कराची रक्कम भरली नसल्याने आणखी ३५ हजार क्विंटल साखरेच्या गोदामांना सील ठोकण्यात आले आहे. पूर्वीची थकबाकी भरली असली तरी उत्पादन शुल्क विभागाने सील काढले नाही. मात्र, शुल्क भरल्यानंतर कारखान्याने सील तोडून साखरेची विल्हेवाट लावल्याचा अंदाज आहे. तीन गोदामांचे सील काढून साखर हलविल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. गोदामातून हलविलेली साखर कारखाना आवारात सापडली नसल्याने साखर चोरीप्रकरणी संबंधितांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)जिल्हा बँकेकडून तपासणीवसंतदादा कारखान्यातील गहाण साखर पोत्यांची तपासणी बुधवारी रात्री जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी केली. बँकेच्या ताब्यात असलेली ६0 हजार ७९0 पोती सुरक्षित असल्याची खातरजमा झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल बँक प्रशासनाला गुरुवारी सादर केला. बँकेने कारखान्याला १५ कोटी रुपयांचे माल ताबेगहाण कर्ज दिले आहे. त्यामुळे याठिकाणच्या गोदामात असलेल्या साखरेची तपासणी करण्यात आली.