शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत आरटीओकडून पुणे-बेंगळुरु महामार्गावर प्रवासी वाहनांची झाडाझडती, नाशिकच्या अपघातानंतर आली जाग

By संतोष भिसे | Updated: October 10, 2022 13:50 IST

एसटी महामंडळाच्या शिवशाही व एसटींकडे मात्र दुर्लक्ष

सांगली : नाशिक येथे खासगी लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभाग खडबडून जागा झाला. रविवारी रात्री उशिरापर्यंत बेंगलुरु-पुणे महामार्गावर वाहनांची तपासणी सुरु होती. यामुळे पेठ नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले.पेठ नाक्यावर उपप्रादेशिक परिवहन आणि पोलीस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत प्रवासी वाहने तपासणी करत होते. विशेषत: पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची झाडाझडती सुरु होती. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, अधिकृत तिकीट नसणे, चालक गणवेषात नसणे, चालकाच्या केबिनमध्ये प्रवासी भरणे आदींची नोंद घेण्यात आली. पेठ नाक्यावर खासगी वाहनातूनही मोठ्या प्रमाणात प्रवासी भरुन मुंबई, पुण्याकडे नेले जातात. यामध्ये मालवाहू ट्रक, दुधाचे टॅंकर्स आदींचा समावेश असतो. त्यांचीही झाडाझडती घेण्यात आली. एसटी महामंडळाच्या शिवशाही व एसटींकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले.रविवार असल्याने प्रवासी गाड्या खचाखच भरुन धावत होत्या. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सनी अवाजवी प्रवासभाडे घेऊन प्रवाशांची लूट केली. बसेस भरुन धावत असल्याने पेठनाक्यावरील प्रवाशांनी मालवाहू गाड्यांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, पण तपासणी सुरु असल्याने ती थांबली नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हालही झाले.आरटीओचे याकडे दुर्लक्ष का?- सर्रास खासगी ट्रॅव्हल्स टप्पा वाहतूक करतात- सणासुदीच्या व गर्दीच्या दिवशी प्रवासभाडे वाढवून लूट करतात- क्षमतेपेक्षा आणि परवान्यापेक्षा जास्त प्रवासी भरतात- चालकाच्या केबीनमध्येही अनधिकृतरित्या प्रवासी बसवतात- सांगली, मिरजेत भररस्त्यात पार्कींग करुन वाहतूक कोंडी करतात- वातानुकुलन, आरामदायी आसनव्यवस्था याची फक्त जाहिरात, प्रत्यक्षात अनेक गाड्यांची दुरवस्था

टॅग्स :SangliसांगलीRto officeआरटीओ ऑफीस