शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत ‘जलयुक्त’च्या कामात घोटाळा-प्रांताधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:50 IST

मिरज : जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी स्थानिक ठेकेदारांना डावलून तालुक्यातील विजयनगर या एकाच गावातील ठेकेदारांना कामे देणे, मंजुरी आदेशाअगोदर कामाचा करार करणे हा प्रकार मिरज पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने घडला आहे.चार गावात सुरू असलेली या योजनेची कामे निकृष्ट असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आल्याने तालुक्यातील जलयुक्त ...

ठळक मुद्देचार गावांतील कामेही निकृष्ट; अधिकारी, ठेकेदारात संगनमत

मिरज : जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी स्थानिक ठेकेदारांना डावलून तालुक्यातील विजयनगर या एकाच गावातील ठेकेदारांना कामे देणे, मंजुरी आदेशाअगोदर कामाचा करार करणे हा प्रकार मिरज पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने घडला आहे.चार गावात सुरू असलेली या योजनेची कामे निकृष्ट असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आल्याने तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामातील घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश प्रांताधिकाºयांनी दिले आहेत.मिरज तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत १ कोटी १० लाख रूपये खर्चाची नाला, ओढा रूंदीकरण व खोलीकरणाची १९ कामे मंजूर आहेत. ही कामे मिरज पंचायत समितीचा छोटे पाटबंधारे विभाग राबवित आहे. जलयुक्त शिवार योजनेची कामे राबविताना स्थानिक ठेकेदारांना प्राधान्य द्यावयाचे आहे. एकापेक्षा अधिक ठेकेदारांची कामांची मागणी असल्यास कामे विभागून द्यावयाची आहेत. मात्र ठेकेदार नियुक्तीचे अधिकार ग्रामपंचायतीला असताना, अधिकाºयांनी ठेकेदार नेमणुकीचा अधिकार सरपंचांकडून लेखी पत्राने स्वत:कडे घेत कामाची मागणी करूनही स्थानिक ठेकेदारांना डावलून संगनमताने विजयनगर गावातील ठेकेदारांना वेगवेगळ्या नावे ठेका दिल्याचे सतीश निळकंठ यांनी निदर्शनास आणून दिले.त्यातच प्रशासकीय मंजुरीपूर्वी करारपत्रही करण्याचा धक्कादायक प्रकार बिसूर येथे घडला आहे. बिसूर येथील नाला, ओढा खोलीकरण व रुंदीकरणासाठी १४ लाख रुपये मंजूर आहेत. ही कामे संगनमताने स्थानिकांना डावलून इतर ठेकेदारांना दिली आहेत. बिसूर येथील कामाला १४ मार्चला मंजुरी मिळाली असताना मंजुरीपूर्वीच सतरा दिवस अगोदर २४ फेब्रुवारी रोजी कामाचे करारपत्र केले आहे. या करारपत्रावर सरपंच व ग्रामसेवकांच्या सहीऐवजी केवळ सरपंचाची सही आहे. प्रशासकीय मंजुरीपूर्वी ठेकेदारी देण्यात घोटाळा करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा ठेका देण्यात झालेला घोटाळा व पंचायत समितीच्या चौकशी समितीने पाहणी केलेली कामे निकृष्ट असल्याचे उघडकीस आले असल्याने या कामाच्या घोटाळ्याची चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी निळकंठ यांनी प्रांताधिकारी विकास खरात यांच्याकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन प्रांताधिकाºयांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.दरम्यान, या कामाच्या घोटाळ्याचे पडसाद २७ मार्च रोजी मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटण्याची शक्यता आहे. पदाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयास एकजुटीने जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे.चौकशीसाठी समितीची नियुक्तीजलयुक्त शिवार योजनेच्या कामाच्या पाहणीसाठी सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, सदस्य अनिल आमटवणे, किरण बंडगर, कृष्णदेव कांबळे व गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीने आरग, बेडग, टाकळी व लिंगनूर या गावातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी केली. यात कामांचा फार्स करून निधी लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. चारही गावातील कामे निकृष्ट असल्याचा चौकशी अहवाल समिती सादर करणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसा