शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

Sangli- दंडोबाच्या निरीक्षण मनोऱ्यावरील शीलालेखावर नव्याने प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 18:37 IST

सांगली : दंडोबा डोंगरावरील निरीक्षण मनोऱ्याच्या दगडी बांधकामातील शिलालेखाची माहिती नव्याने उजेडात आणण्याचा प्रयत्न इतिहास अभ्यासकांनी केला आहे. या ...

सांगली : दंडोबा डोंगरावरील निरीक्षण मनोऱ्याच्या दगडी बांधकामातील शिलालेखाची माहिती नव्याने उजेडात आणण्याचा प्रयत्न इतिहास अभ्यासकांनी केला आहे. या शिलालेखामध्ये दाम्पत्याचे शिल्प व त्याशेजारी काही मजकूर कोरला आहे.कवठेमहांकाळ येथील इतिहास अभ्यासक पवनपुत्र जकाते यांनी शिलालेखाविषयी माहिती दिली. शिल्प व शिलालेख उंचावर असल्याने सहसा कोणाच्या दृष्टीस पडत नाही. इतिहासाचे अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी मजकुराचे वाचन केले. ‘श्री दंडनाथ चरणी नागोजी राम देशपांडे प्रा| (प्रांत) मिरज’ असा मजकूर आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी नागोजी राम यांना मिरज परगण्याचे देशपांडे पण दिल्याचे पत्र आहे. शाहू दप्तरातील वर्णनात्मक सूची खंड २ मध्ये ते उपलब्ध आहे. शाहू महाराजांच्या काळात नागोजी राम ही महत्त्वपूर्ण व्यक्ती होती. पूर्वी परगण्याच्या जमाबंदीचे दप्तर सांभाळण्याचे काम देशपांडे करायचे. उत्पन्नातील ठराविक महसूल त्यांना मिळत असे.दंडोबा डोंगरावर नागोजी राम देशपांडे या व्यक्तीने हा निरीक्षण मनोरा बांधला असावा किंवा त्यांच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधली असावी, असा कयास आहे. नागोजी राम यांची ही समाधी आहे? की त्यांच्या आठवणीत बांधलेली दीपमाळ आहे याविषयीदेखील मतमतांतरे आहेत. हा शिलालेख व वास्तू सुमारे पावणेतीनशे वर्ष जुनी असावी असे जकाते म्हणाले. संशोधनकामी त्यांना दुर्ग अभ्यासक प्रवीण भोसले व इतिहास संशोधक मानसिंग कुमठेकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Sangliसांगली