शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिरसीच्या खुनाची माहिती देणार्‍यास बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : शिरसी (ता. शिराळा) येथील चक्र भैरवनाथ मंदिराच्या गाभाºयात शनिवार दि. १८ रोजी अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर, ‘नरबळी’तूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.रविवारीही या मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. तसेच हल्लेखोरांबाबतही धागेदोरे मिळाले नाहीत. रविवारी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : शिरसी (ता. शिराळा) येथील चक्र भैरवनाथ मंदिराच्या गाभाºयात शनिवार दि. १८ रोजी अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर, ‘नरबळी’तूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.रविवारीही या मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. तसेच हल्लेखोरांबाबतही धागेदोरे मिळाले नाहीत. रविवारी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. रात्री उशिरा विशेष पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.याप्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात ‘अज्ञात व्यक्तीकडून अज्ञात व्यक्तीचा खून’ अशी नोंद करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाºयात मूर्तीजवळ लिंबूला टाचण्या खोवल्या होत्या, तसेच गुलाल, हळद-कुंकू ठेवले होते. मृत व्यक्तीजवळील प्लॅस्टिक पिशवीतही याच वस्तू होत्या. मृत व्यक्तीच्या अंगावर नवीन कपडे होते. त्याच्या डोक्यावर मागील बाजूस जवळच पडलेल्या दगड, विटांनी हल्ला केल्याचे दिसून येत आहे. त्याच्या खिशात पाचवा मैल ते अंकलखोप या बस प्रवासाचे तिकीट मिळाले आहे. मंदिर परिसरातील स्थिती पाहता, हा नरबळीचा प्रकार असावा, अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे.त्यामुळे रविवारी जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख बोराटे, उपविभागीय पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, प्रवीण जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी मंदिराचे विश्वस्त दत्तात्रय महिंद, निवृत्त पोलिस अधिकारी बापूराव जाधव, सरपंच रुपाली भोसले, शेखर भोसले, तसेच मंदिराचे काम करणाºया कामगारांकडे चौकशी करून माहिती घेतली. सायंकाळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मृत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या एसटी बस तिकिटाच्या पुराव्यावरून तीन ते चार ठिकाणी पोलिस पथके तपासासाठी पाठविण्यात आली आहेत.चक्र भैरवनाथ मंदिरात बळी देण्याची कोणतीही प्रथा नाही. फक्त गोडा नैवेद्य दाखविला जातो. असे असताना मंदिरात संशयास्पद मृतदेह मिळून आला. या नरबळीच्या चर्चेने परिसरात खळबळ उडाली आहे.तपासासाठी सहकार्याचे आवाहनतुम्ही निवृत्त पोलिस अधिकारी आहात. येथील युवकांना हाताशी धरून पोलिस तपासात मदत करा. खुन्याचा शोध लावल्यास तुम्हाला योग्य बक्षीस देऊ, असे आवाहन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी निवृत्त पोलिस अधिकारी बापूराव जाधव यांना केले. रविवारी अधिकाºयांनी या पूर्ण परिसराची तपासणी केली. पोलिस वाहनांचा ताफा पाहून नागरिकांनीही गर्दी केली होती.

टॅग्स :crimeगुन्हे