शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांना पोसण्याचा उद्योग : सांगली महासभेत आरोप-डेंग्यू, चिकुनगुन्यावरून अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:02 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात डेंग्यू, चिकुनगुन्याची साथ असताना आरोग्य विभाग झोपा काढतो आहे. कुणाला काय अधिकार आहेत, हेच माहीत नाही.

ठळक मुद्देघंटागाडीवर लहान मुलांना कामाला लावले जात आहे. सोशल मीडियावर तशी छायाचित्रे आली आहेत, असा आरोप केला.मग नेमका अधिकार कुणाला?

सांगली : महापालिका क्षेत्रात डेंग्यू, चिकुनगुन्याची साथ असताना आरोग्य विभाग झोपा काढतो आहे. कुणाला काय अधिकार आहेत, हेच माहीत नाही. सहायक आरोग्याधिकाºयांना हटविण्याचा ठराव केला असतानाही त्यांना पोसण्याचा उद्योग कशासाठी? असा संतप्त सवाल सोमवारी महासभेत केला.

महापौर हारुण शिकलगार यांना आरोग्याच्या विषयावर बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले.महापालिकेची तहकूब सभा सोमवारी झाली. अश्विनी खंडागळे यांनी डेंग्यू, चिकुनगुन्यावर काय उपाययोजना केल्या, असा प्रश्न केला. त्यावर सहायक आरोग्याधिकारी संजय कवठेकर यांनी डेंग्यूचे ४९ संशयित व चिकुनगुन्याचे ४० संशयित आढळले असून, प्रत्येकी सहाजण पॉझिटीव्ह आहे. ठिकठिकाणी औषध फवारणी करण्यात आल्याचा खुलासा केला. पण, त्याला सुरेश आवटी यांनी आक्षेप घेतला. चारही सहायक आरोग्याधिकाºयांना हटविण्याच्या ठरावावर अंमलबजावणी का केली नाही? आरोग्याधिकाºयांचे कोणी ऐकत नाहीत. त्यांना काहीच अनुभव नाही. कुणाला काय अधिकार दिले आहेत याची माहितीच नाही. मग नेमका अधिकार कुणाला? अखेर महापौरांनी या विषयावर बुधवारी प्रशासनासोबत बैठक घेण्याची हमी दिली....तर मी राजीनामा देतो : खोतसभेत धनपाल खोत यांनी मुकादम, स्वच्छता निरीक्षकांवर गंभीर आरोप केले. हजेरी शेडवर सकाळी मुकादम, स्वच्छता निरीक्षक हजर नसतात. त्यांच्याऐवजी बोगस व्यक्ती उपस्थित असतो. तोच कर्मचाºयांची हजेरी मांडतो. हजेरीपत्रकावर त्यांच्या सह्या आहेत का? ते तपासा. सत्य उघड होईल. यात काही खोटे असेल तर, मी नगरसेवकपदाचा राजीनामा देतो, असे जाहीर आव्हान दिले, तर संतोष पाटील यांनी घंटागाडीवर लहान मुलांना कामाला लावले जात आहे. सोशल मीडियावर तशी छायाचित्रे आली आहेत, असा आरोप केला.व्हिडिओ गेमचे परवाने रद्दमहापालिका हद्दीत व्हिडिओ गेमचे प्रस्थ वाढले आहे. त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. यासाठी महापालिकेकडून परवाने दिले जातात. आता यापुढे एकाही व्हिडिओ गेम पार्लरसाठी परवाना दिला जाणार नाही. तसेच यापूर्वी दिलेले परवानेही रद्द करण्याचा ठराव महासभेत ऐनवेळी करणार असल्याचे महापौर हारुण शिकलगार यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली