सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस बुधवारीही कायम होता. गेल्या २४ तासांत सरासरी ३१.८ मिलिमीटर, तर वाळवा तालुक्यात सर्वाधिक ५१.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधारेमुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या असून, काढणी-मळणीतील खरीप पिकांचे नुकसान होत आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी जिल्ह्याच्या बहुतांशी भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही भागांत तो मुसळधार होता. त्यामुळे ओढे आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.परतीच्या पावसाचा जोर वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खरीप ज्वारी, बाजरी, सोयाबीन आणि कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, रब्बी हंगामातील पेरण्याही संततधार पावसामुळे थांबल्या आहेत.
जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटर)तालुका दिवसातील पाऊस एकूण पाऊसमिरज १७.५ ५४४.४जत २६.४ ५७५.१खानापूर ३२ ६९५.९वाळवा ५१.९ ७६०.३तासगाव २३.१ ६२०.१शिराळा ४५.५ १३३२.७आटपाडी ५.८ ४१८.१क. महांकाळ ३४.३ ६८०.६पलूस २६.९ ५५३.८कडेगाव ४०.७ ६३८.३धरणे भरली काठोकाठ (साठा टीएमसीत)धरण क्षमता सध्याचा पाणीसाठाकोयना १०५.२५ १०४.६०धोम १३.५० १३.५०कण्हेर १०.१० १०.१०वारणा ३४.३४ ३४.४०अलमट्टी १२३ १२३.०१