शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मिरज रेल्वे स्थानक परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 14:28 IST

​​​​​​​पाचवे शिवभोजन केंद्र मिरज रेल्वे स्थानक परिसरात हॉटेल व्यंकटेश्वर येथे दि. 9 मार्च पासून सुरू करण्यात आले. पाचव्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन आमदार सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण 5 शिवभोजन केंद्र सुरूआमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन

सांगली : गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देणारी शिवभोजन योजना संपूर्ण राज्यामध्ये दिनांक 26 जानेवारी 2020 पासून दुपारी 12 ते 2 या वेळेत कार्यान्वीत झालेली आहे. त्यानुसार दिनांक 26 जानेवारी पासून सांगली शहरामध्ये 3 ठिकाणी व दि. 2 मार्च पासून मिरज शहरात एका ठिकाणी ही योजना कार्यान्वीत आहे.पाचवे शिवभोजन केंद्र मिरज रेल्वे स्थानक परिसरात हॉटेल व्यंकटेश्वर येथे दि. 9 मार्च पासून सुरू करण्यात आले. पाचव्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.मिरज रेल्वे स्थानक परिसरात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, मिरज उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे, तहसिलदार रणजित देसाई, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, शिवभोजन केंद्र चालक विष्णू बाळरी उपस्थित होते.राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने सांगली शहरात सांगली बस स्थानक उपहारगृह, मुख्य हमाल चौक मार्केट यार्ड व सांगली सिव्हील हॉस्पीटल परिसर तर मिरज शहरात मिरज ग्रामीण बस स्थानक उपहारगृह या चार ठिकाणी ही योजना कार्यान्वित आहे.

दि. 9 मार्च पासून मिरज रेल्वे स्थानक परिसरात 5 वे शिवभोजन केंद्र सुरू झाले आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार दिनांक 19 फेब्रुवारी 2020 पासून सांगली मधील शिवभोजन केंद्राच्या थाळी क्षमतेत वाढ करून 150 वरून ती प्रति केंद्र 200 थाळी झालेली आहे. मिरज शहरात सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रांची थाळी क्षमता प्रति केंद्र 150 असून या केंद्रांमधून दिनांक 8 मार्च 2020 पर्यंत 22 हजार 679 इतके थाळी वाटप झाले आहे.ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहाणार आहेत. या भोजनालयांमध्ये बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल. सदरची सवलत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व उक्त आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय नाही. शिवभोजन योजनेस कोणतीही साप्ताहिक सुट्टी नाही. गरीब व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयSangliसांगली