शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकले, सांगलीतील १५ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 15:54 IST

जिल्ह्यातील ४३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले

सांगली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जुलै २०२२ मध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीपरीक्षा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा पाचवीचा २८.१५ तर आठवीचा १६.९७ टक्के निकाल लागला.पाचवीचे १२ आणि आठवीचे ९ असे मिळून २१ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. ग्रामीण भागातील तब्बल १५ विद्यार्थी राज्य यादीत चमकले.शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल बुधवारी प्रसिद्ध झाल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती (पाचवी) परीक्षेसाठी १८ हजार १२३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी १७ हजार २०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पाचवीचा निकाल २८.१५ टक्के लागला असून, राज्याच्या गुणवत्ता यादीत १२ विद्यार्थी चमकले.सीबीएसई शाळेतील पाचवीच्या एका विद्यार्थ्यांनीही राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. याशिवाय जिल्ह्यातील ४३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत सर्वाधिक मराठी माध्यमाच्या २४७ विद्यार्थी आहेत. इंग्रजी माध्यमाचे १४, कन्नड माध्यम १०, मराठी-इंग्रजी माध्यमाच्या ९ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ११ हजार ४०२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी १० हजार ७५३ जणांनी परीक्षा दिली होती.आठवीचा निकाल १६.९७ टक्के लागला असून, राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील ९ विद्यार्थी चमकले आहेत. जिल्ह्यातील ४२३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील जिल्ह्यातील टॉप टेन विद्यार्थीपाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील जिल्हा गुणवत्ता यादीतील पहिले दहा विद्यार्थी  : अग्रजा गणेश गुरव, शाहीद शब्बीर तांबोळी, श्रावणी सचिन सपकाळ, अमय अनिल जाधव, सुजल श्रीकांत कणसे, विश्वभारती विनायक पाटील, अभिजित भगवान जावडे, पार्थ चंद्रकांत पाटील, चिन्मय नामदेव गुरव.आठवी - निर्झरा अनिल गायकवाड, सार्थक महेश पाटील, आदित्य विजय खिलारी, श्रेणिक प्रताप शिंदे, अर्थव विजय खिलारी, अनिकेत शामराव शिंदे, स्वरा श्रीकांत अहंकरी, मधुरा प्रताप पाटील, आयुष्णी विजय जाधव, वैभव दादासाहेब खांडेकर.अग्रजा, शाहीद सहावीअग्रजा गणेश गुरव (९५.९७ टक्के, जि. प. शाळा, आरग, ता. मिरज), शाहीद शब्बीर तांबोळी (९५.९७ टक्के, जि. प. शाळा दहिवडी, ता. तासगाव) या दोन विद्यार्थ्यांचा राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा