शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

सांगली महापालिकेच्या स्थायी सभेत बजेट फाडले; पाण्यासाठी सदस्याचा सभात्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 12:29 IST

सत्ताधारी भाजप व प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोप

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत मंगळवारी काँग्रेस सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. स्थायी समितीकडून यंदाच्या अंदाजपत्रकाला विलंब झाल्याच्या निषेधार्थ नगरसेवक संतोष पाटील यांनी प्रशासनाचे बजेट फाडले तर नगरसेवक फिरोज पठाण यांनी रमामातानगरमधील पिण्याच्या पाण्याची समस्या न सोडविल्याने सभात्याग केला. अखेर सभापती धीरज सूर्यवंशी यांनी नवीन जलवाहिनी टाकण्याचे आदेश देत पठाण यांना सभात्याग मागे घेण्यास भाग पाडले.स्थायी समितीची सभा सभापती सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत काँग्रेसचे सदस्य आक्रमक होते. सभेच्या सुरूवातीलाच फिरोज पठाण यांनी रमामातानगर, सहारा चौक, शमु पटेल गल्ली, माने गल्लीसह नऊ गल्ल्यांत चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी येत नाही. टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागाने रस्त्यावर खड्डे काढले पण तेही मुजविलेले नाही. रमजान ईद तोंडावर असून तातडीने मार्ग काढा, अशी मागणी करत सभेचे कामकाज रोखून धरले. प्रशासनाकडून अपेक्षित उत्तर न आल्याने त्यांनी सभात्याग केला. पण सभापतींनी त्यांना रोखत तातडीने ठेकेदाराला बोलावून घेतले. या परिसरातील नागरिकांसाठी नवीन जलवाहिनीचे काम हाती घेण्याचे आदेश दिले.

काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी अंदाजपत्रकाला विलंब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. ३१ मार्चपूर्वी अंदाजपत्रक महासभेकडून मंजूर होणे अपेक्षित होते. पण अद्यापही अंदाजपत्रक तयार झालेले नाही. त्यात प्रशासनाने आयुक्तांच्या अंदाजपत्रकानुसार निधी खर्च करण्यास सुरुवात केली आहे. बजेटपूर्वी प्रशासनाकडून गतवर्षीचा जमा-खर्चाचे विवरणपत्रही स्थायीकडे आलेले नाही. सत्ताधारी भाजप व प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोप करत त्यांनी सभेत आयुक्तांचे अंदाजपत्रक फाडले. सभापतींनी येत्या आठ दिवसांत अंदाजपत्रक महापौरांकडे देणार असल्याचे सांगितले.

स्वच्छता निरीक्षकांना नोटीसमहापालिकेकडून नवीन शौचालयासाठी अनुदान दिले जाते. पण सध्या अनुदान बंद असल्याचे स्वच्छता निरीक्षकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून प्रस्ताव दाखल होत नसल्याची बाब नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी निदर्शनास आणून दिली. यावर सभापतींनी संबंधित स्वच्छता निरीक्षकांना नोटीस काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले तसेच नवीन शौचालयासाठी अनुदान वाटप सुरू असून नागरिकांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीBudgetअर्थसंकल्प 2023