सांगली : शिराळा नगर पंचायतीच्या निवडणुकीत तब्बल १७ उमेदवारांची अनामत जप्त झाली. अटीतटीच्या राजकीय संघर्षात त्यांचा सपशेल पराभव झाला. नगराध्यक्षपदाच्या ६ उमेदवारांना, तर नगरसेवकपदाच्या ११ उमेदवारांना अनामत रक्कम जप्तीच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत जोरदार टशन रंगले. नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असलेल्या एका उमेदवाराला अनामत गमवावी लागली. नगरसेवक पदाच्या शर्यतीतील १५ उमेदवारांची अनामत जप्त झाली.उरुण इस्लामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मात्र तब्बल ३८ जणांना अनामत वाचविण्यापुरीतीही मते मिळवता आली नाहीत. नगराध्यक्षपदासाठी ६ आणि १५ प्रभागांतील ३० जागांसाठी ९४ अशा एकूण १०० उमेदवारांनी निवडणुकीत आपले नशीब आजमावले. त्यापैकी नगराध्यक्ष पदासाठी लढलेल्या चौघांना आणि नगरसेवकपदाच्या ३४ अशा एकूण ३८ जणांना अनामत वाचवता आली नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले.तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ५, तर नगरसेवक पदाच्या २४ जागांसाठी ८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील नगराध्यक्ष पदाच्या तिघांना अनामत वाचवता आली नाही. नगरसेवक पदाच्या तब्बल ४० उमेदवारांची अनामत जप्त झाली.पलूसमध्ये नगराध्यक्ष पदाच्या तिघांना व नगरसेवक पदाच्या सातजणांना अनामत वाचविण्यापुरतीही मते मिळविता आली नाहीत. विट्यात नगराध्यक्ष पदाच्या एकाची आणि नगरसेवक पदाच्या दहाजणांची अनामत जप्त झाली.
आष्ट्यात पती-पत्नीला ३२ मतेआष्ट्यात नगरसेवक पदाच्या दोघांची अनामत जप्त झाली. प्रभाग ११ मधून स्वप्ना वाडेकर यांना ३२ आणि त्यांचे पती अनुप वाडेकर यांनाही ३२ मते मिळाली.
Web Summary : In Sangli district's municipal elections, numerous candidates across Shirala, Atpadi, Uran Islampur, Tasgaon, Palus, and Vita lost their deposits due to insufficient votes. Uran Islampur saw the highest number, with 38 candidates failing to secure enough votes to save their deposits.
Web Summary : सांगली जिले के नगरपालिका चुनावों में, शिरला, आटपाडी, उरण इस्लामपुर, तासगांव, पलूस और विटा में कई उम्मीदवारों की अपर्याप्त वोटों के कारण जमानत जब्त हो गई। उरण इस्लामपुर में सबसे अधिक 38 उम्मीदवार अपनी जमानत बचाने में विफल रहे।