शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'जी-२०'त मिरजेतील तंतुवाद्यांची तार झंकारणार, तंतुवाद्य निर्मात्यांना राज्याच्या उद्योग विभागाचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 14:36 IST

चालू वर्षी जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान भारताला मिळाला

सदानंद औंधेमिरज : मुंबईत होणाऱ्या जी-२० या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निमंत्रित परदेशी पाहुण्यांना महाराष्ट्राच्या कलावैभवाची ओळख करून देण्यासाठी हस्तकला प्रदर्शनाबरोबरच मिरजेतील तंतुवाद्यांचेही प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या उद्योग सहसंचालकांनी मिरज म्युझिकल क्लस्टरला निमंत्रित केले आहे.चालू वर्षी जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान भारताला मिळाला असून या परिषदेत विविध देशातील सुमारे २०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या अनुषंगाने परिषदेची पहिली बैठक मंगळवारी दि. १३ ते १६ डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स व सांताक्रूज येथील एका हॉटेलमध्ये होणार आहे.

परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या निमंत्रितांना महाराष्ट्राच्या कलावैभवाची ओळख घडविण्यासाठी या ठिकाणी हस्तकलेचे स्टॉल लावण्यात येणार असून मिरजेत तंतुवाद्य कारागिरांसाठीही येथे स्टॉल उपलब्ध करण्यात आला आहे. यासाठी मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांची संस्था असलेल्या मिरज म्युझिकल क्लस्टरला राज्याच्या उद्योग विभागाने निमंत्रण दिले आहे.परिषदेत सहभासाठी तंतुवाद्यांचा क्यूआर कोड तयार करून संबंधित वाद्यांची माहिती, दर्जा व इतर तपशील दर्शविण्यात येणार आहे. आकर्षक सजावट केलेल्या स्टाॅलवर तंतुवाद्य प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. परदेशातून आलेल्या निमंत्रितांना तंतुवाद्यांची इंग्रजीतून माहिती देण्यासाठी सफाईदार इंग्रजी बोलणारा माहीतगार स्टॉलवर ठेवण्याच्या सूचना उद्योग सहसंचालकांनी दिल्या आहेत. मिरज म्युझिकल क्लस्टरचे मोहसीन मिरजकर व अल्ताफ पिरजादे परिषदेच्या पहिल्या बैठकीतील तंतुवाद्य प्रदर्शनासाठी मुंबईला गेले आहेत.

‘तंतुवाद्याचे माहेरघर’ अशी ख्याती असलेल्या मिरजेतील तंतुवाद्यनिर्मितीच्या कलेचे प्रदर्शन जी-२० परिषदेत होणार आहे. यामुळे मिरजेच्या लौकिकात भर पडणार आहे. मिरज शहर तंतुवाद्य निर्मितीसाठी जगभरात ख्यातनाम आहे. तंतुवाद्यनिर्मिती व्यवसायास सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. मिरजेतील तंतुवाद्यांना जगभरात मागणी आहे. विविध देशातील संगीतप्रेमींना भारतीय वाद्यांविषयी कुतूहल, जिज्ञासा आहे. देशातील अनेक दिग्गज गायक-वादक मिरजेत तयार झालेली वाद्ये वापरतात.

मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीचा बहुमानमिरजेतील तंतुवाद्य निर्माते मजीद सतामेकर यांना नुकताच संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला असून आता मिरजेतील तंतुवाद्यांना आंतर राष्ट्रीय परिषदेत स्थान मिळाल्याने मिरजेच्या तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रासाठी बहुमानाची गोष्ट आहे.

टॅग्स :Sangliसांगली