शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Sangli: जत तालुक्याच्या पूर्व भागात म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल, सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते पूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 13:34 IST

उमदी : मायथळ येथून कॅनाॅलद्वारे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी माडग्याळ ओढ्यात सोडण्यात आले. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ...

उमदी : मायथळ येथून कॅनाॅलद्वारे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी माडग्याळ ओढ्यात सोडण्यात आले. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार संजय पाटील, गोपीचंद पडळकर, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते पाणीपूजन करण्यात आले.यावेळी खासदार पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री फडणवीस म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची विस्तारित कामे लवकरच कामे पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करतील. लोकांची पाण्याची मागणी आहे. पाणी मिळाले पाहिजे ही आमची देखील भावना आहे. जरी प्रशासकीय अडचणी आल्या असल्या तरी देखील माडग्याळ येथील शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी जत पूर्व भागात दाखल होत आहे. पंतप्रधान कृषी योजनेतून २१०० कोटी दिल्याने बंदिस्त पाइपमधून पाणी आले.विलासराव जगताप म्हणाले, म्हैसाळच्या मूळ योजनेकडे दुर्लक्ष नको. विस्तारित म्हैसाळ योजनेला प्राधान्य द्या. म्हैसाळ योजनेतून ६५ गावांना पाणी मिळावे. ९०० कोटी असलेली विस्तारित योजना होणे गरजेचे आहे.आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, तालुक्यातील सर्व जमिनी ओलिताखाली याव्यात यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. अधिवेशनात मी जत तालुक्यातील प्रश्न मांडले. दुष्काळी तालुक्यात जी सवलत मिळायला पाहिजे होते ती मिळाली नाही.आमदार पडळकर म्हणाले, विस्तारित योजनेसाठी आम्ही सगळे जण प्रयत्न करू. दुष्काळ संपला पाहिजे, अशी भावना असणे चालत नाही त्यासाठी काम करावे लागते. यावेळी प्रकाशराव जमदाडे, तम्मनगौडा रवी पाटील, मन्सूर खतीब, तुकाराम बाबा, सचिन निकम यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी रवींद्र आरळी, सरदार पाटील, सुनील पवार, सुरेश शिंदे, प्रमोद सावंत, अण्णा भिसे, भुपेत्र कांबळे, सरपंच सौ. अनिता माळी, सरपंच मुत्तू तेली, उपसरपंच सौ. सविता सावंत, सोमन्ना हाके, लिंबाजी माळी, सोमनिंग बोरामणी, महादेव अंकलगी सह मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विठ्ठल निकम यांनी, तर सूत्रसंचालन सचिन निकम यांनी केले.

जगताप यांनी थांबावेविलासराव जगताप हे आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. तसेच, वस्तादों के वस्ताद जगताप साहेब असं कौतुक करत त्यांनी आता थांबावे, असा टोला खासदार पाटील यांनी दिला.शुक्राचार्यांमुळे विलंब२०२० लाच म्हैसाळचे पाणी जत पूर्व भागात आले असते. मात्र, तालुक्यातील शुक्राचार्यांमुळे एवढा कालावधी लागला, असा टोला जमदाडे यांनी स्थानिक नेत्यांना दिला.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी