शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक गुणवत्तेत सांगलीची भरारी, दहाव्यावरून चौथ्या स्थानावर झेप

By अशोक डोंबाळे | Updated: January 31, 2023 18:05 IST

जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मॉडेल स्कूलसह अनेक उपक्रम राबविले

अशोक डोंबाळेसांगली : पहिली ते आठवीच्या भाषा व गणितात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रगती ४ ते ८ टक्क्यांनी वाढली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत जिल्हा २०१८ मध्ये दहाव्या स्थानी होता, तो २०२२ मध्ये चौथ्या स्थानावर आला आहे. ‘असर’ने २०१८ आणि २०२२ मध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन शैक्षणिक गुणवत्तेचा अहवाल जाहीर केला आहे.दि. १८ जानेवारीरोजी ‘असर’ सर्वेक्षण जाहीर झाले आहे. कोरोना काळात मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मॉडेल स्कूलसह अनेक उपक्रम राबविले. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासह विद्यार्थ्यांच्या परीक्षा वाढविल्यामुळे गुणवत्तेत वाढ झाली.जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाषा, गणित व इंग्रजीच्या मूलभूत क्षमता प्राप्तीसाठी विशेष प्रयत्न केले. तंत्रज्ञानाचा वापर, स्थानिक परिस्थितीद्वारे अनुभवातून शिक्षण, यावर विशेष कार्य जिल्हा परिषद प्रशासनाने केले. अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचेही विशेष लक्ष आहे.

शाळाबाह्य मुलांचे प्रमाण ०.४ टक्के घटलेअंगणवाडी व सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची नोंदणी वाढली आहे. शिक्षक व शाळा यांचा सकारात्मक प्रतिसाद व शाळा आणि पालक यांच्यातील समन्वय दिसत आहे. पालक खासगी शाळांकडून पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वळताना दिसत आहेत. शाळाबाह्य मुलांचे प्रमाण हे २०१८ च्या तुलनेत ०.८ वरून ०.४ झाले आहे.

जिल्ह्यातील ४०.७ टक्के मुले कच्चीजिल्हा परिषद शाळांतील मुलांच्या गुणवत्तेचा विचार केल्यास पहिल्या क्रमांकावर कोल्हापूर, दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग तर तिसऱ्या स्थानावर रत्नागिरी जिल्हा आहे. सांगली जिल्हा दहाव्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर आला आहे. पण, आजही जिल्हा परिषद शाळेतील ४०.७ टक्के मुले भाषा, गणितात कच्ची आहेत.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताजिल्हा - टक्केवारीकोल्हापूर - ७१.१सिंधुदुर्ग - ६७.७रत्नागिरी - ६७.६सांगली - ५९.३पुणे - ५७.८

टॅग्स :SangliसांगलीEducationशिक्षण