शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
3
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
4
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
5
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
6
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
7
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
8
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
9
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
10
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
11
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
12
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
13
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
14
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
15
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
16
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
17
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
18
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
19
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
20
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

Sangli-Local Body Election: शिराळ्यात ‘काका-पुतण्या’ यांच्यातील संघर्ष, भानामतीच्या चर्चेने गाजली निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:39 IST

दुरंगी लढतीने चुरस, निकाल लांबल्याने उमेदवार तणावाखाली

विकास शहाशिराळा : शिराळा नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकूण ५७ उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, अर्ज माघारीच्या नाट्यमय घडामोडीनंतर अनेक जणांची तलवार म्यान झाली आणि मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप-शिंदेसेना अशी दुरंगी झाली. विशेष म्हणजे, या निवडणुकीतून काँग्रेस आणि उद्धवसेना ‘गायब’ झाल्याचे चित्र होते.‘काका-पुतण्या’ संघर्ष : नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे अभिजीत नाईक आणि भाजप-शिंदेसेनेचे पृथ्वीसिंग नाईक यांच्यात थेट लढत झाली. याशिवाय, सहा अपक्ष उमेदवारही मैदानात होते. ज्यामुळे मतांच्या विभाजनाची चर्चा जोरदार सुरू आहे. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, रणधीर नाईक, विराज नाईक यांची राष्ट्रवादीसाठी तर खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, ॲड. भगतसिंग नाईक, सम्राट महाडिक यांनी मोर्चेबांधणी केली होती. नागपंचमीला जिवंत नागाच्या पूजेसाठी कोणाला किती परवानगी मिळाली, हा मुद्दा प्रचारात गाजला. भाजपने २० नागांना शैक्षणिक उपयोगासाठी परवानगीचा मुद्दा उचलला, तर राष्ट्रवादीने ६४ मंडळांना प्रत्येकी ५ नाग पकडण्याची परवानगी आणल्याचा दावा केला. छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा निधी कोणी अडवला? शहरातील विकास कोणी केला आणि कोणी रोखला? या मुद्द्यांभोवती राजकारण केंद्रित झाले होते. निवडणुकीदरम्यान दोन ठिकाणी झालेले भानामतीचे प्रकार शहरभर चर्चेचे विषय ठरले. या निवडणुकीतील सर्वात मोठी राजकीय उलथापालथ म्हणजे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक यांना त्यांचे सासरे विश्वास कदम यांनी, तर अभिजीत नाईक यांना त्यांचे ज्येष्ठ बंधू रणजितसिंह नाईक यांनी पक्षांतर करून पाठिंबा दिला. निकाल लांबल्याने उमेदवार तणावाखालीकार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशही झाले, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अर्ज माघारी घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची शेवटपर्यंत मनधरणी आणि आश्वासने देण्याची धावपळ सुरू होती. मतमोजणी लांबल्यामुळे रिंगणातील सर्व उमेदवार प्रचंड तणावाखाली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Local Election: Shirala witnesses a 'Uncle-Nephew' clash, Bhanamati discussion.

Web Summary : Shirala's election saw a straight fight between NCP and BJP-Shinde Sena. 'Uncle-Nephew' rivalry dominated the campaign, alongside debates over development and alleged black magic incidents. Party switching added drama.