शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बुडव्या व्यापाऱ्यांवरून सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनमध्ये धुसफुस, अडत्यांनी स्थापन केली वेगळी संघटना

By अशोक डोंबाळे | Updated: August 30, 2022 12:09 IST

सांगली : सौद्यातून बेदाणा घेऊन गेल्यानंतर व्यापारी वेळेवर पैसे देत नसल्यामुळे सांगली -तासगाव बेदाणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफुस सुरू झाली ...

सांगली : सौद्यातून बेदाणा घेऊन गेल्यानंतर व्यापारी वेळेवर पैसे देत नसल्यामुळे सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. अडत्यांच्या प्रश्नाकडे असोसिएशनचे पदाधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप करून ४० अडत्यांनी वेगळी चूल मांडत सांगली बेदाणा अडत संघटनेची स्थापना केली आहे.बेदाणा सौदे आणि द्राक्ष खरेदीमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. देशभरातून व्यापारी बेदाणा सौद्यात येऊन विश्वासार्हता निर्माण करून बेदाणा खरेदी करून निघून जातात. ते पुन्हा सांगलीकडे फिरकतच नाहीत. अडत्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. व्यापाऱ्यांकडून अडत्यांना ४० दिवसात मिळणारे पैसे सध्या ७० ते ८० दिवसातही मिळत नाहीत. व्यापाऱ्यांनी पैसे थकविले म्हणून अडत्यांना शेतकऱ्यांचे पैसे थकीत ठेवून चालत नाही. यातून अडत्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. व्यापाऱ्यांकडील कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम हेच बेदाणा असोसिएशनच्या संघर्षाला कारण आहे.वेगळा संसार फार काळ टिकणार नाही : राजेंद्र कुंभारबेदाणा असोसिएशन व्यापारी, अडत्यांच्या हितासाठी काम करणारी संघटना आहे. असोसिएशन म्हणजे वसुली अधिकारी नाही. व्यापारी आणि अडत्यांनी एकमेकांच्या विश्वासावरच व्यवहार केला पाहिजे. असोसिएशनने व्यापाऱ्यांकडील थकीत पैसे वसूल करून दिले आहेत, असे मत सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केले. वेगळा संसार फार काळ टिकत नाही, पुन्हा ते आमच्याकडेच येणार आहेत, असेही ते म्हणाले.असोसिएशनचे संचालक मंडळच बेकायदेशीरसांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनची मान्यता २०१८ पासून रद्द झाली आहे. तरीही संचालक मंडळाची निवडणूक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन संचालक मंडळ तयार केले आहे. या संचालक मंडळाला काहीही अधिकार नाही, असा आरोप बेदाणा असोसिएशनच्या काही सभासदांचा आहे.असोसिएशनच्या मान्यतेचा प्रश्न आठवड्यात सुटणारसांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनच्या मान्यतेचा प्रश्न काही कागदपत्रांमुळे निर्माण झाला आहे. याबद्दल न्यायालयात सुनावणी सुरू असून आवश्यक कागदपत्रे दिली आहेत. येत्या आठवड्यात असोसिएशनच्या मान्यतेचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी दिली.अडत्यांच्या हक्कासाठी संघटना काढली : प्रशांत पाटील-मजलेकरसांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनचे आम्ही सभासद आहोतच, पण अडत्यांचे बेदाणा सौद्यातील पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे ४० जणांची सांगली अडत बेदाणा संघटना स्थापन केली आहे. या माध्यमातून अडत्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ. अडत्यांच्या हक्कासाठी ही संघटना काम करणार आहे, असे मत अडत संघटनेचे प्रशांत पाटील-मजलेकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Sangliसांगली