आरीफ कापशीकर यानी वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतून घेतलेल्या ५० लाखाचे कर्जाची परतफेड केली नाही. बँकेस कर्जापोटी कापशीकर यानी दि. १६ जुलै २००८ रोजी ७० लाखाचा धनादेश दिला होता. मात्र कापशीकर यांचा ७० लाखाचा धनादेश वटला नसल्याने बँकेने मिरज न्यायालयात फाैजदारी खटला दाखल केला होता. कापशीकर याने कर्जाच्या परतफेडीसाठी ७० लाखाचा धनादेश बँकेला दिल्याचे सिद्ध झाल्याने मिरज न्यायालयाने दि. २५ मे २०१२ रोजी सहा महिने कारावास व ७५ लाखाचा दंड ठोठावला.
या निर्णयाविरोधात कापशीकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते. जिल्हा सत्र न्यायालयाने हे अपील फेटाळले. कापशीकर यांचा जामीन रद्द करुन मिरज न्यायालयाच्या निकालानुसार शिक्षा ठोठावण्याचे आदेश दि. २० ऑगस्ट रोजी दिले आहेत.