शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील प्रकरणे तात्काळ मंजूर करा : संजय पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 11:50 IST

बँकांनी कर्जाच्या हमीबाबत शंका न बाळगता तात्काळ प्रकरणे मंजूर करावीत असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले.

ठळक मुद्देअण्णासाहेब पाटील महामंडळाकडील प्रकरणे तात्काळ मंजूर करा : संजय पवारजिल्ह्यात 502 लाभार्थ्यांना 32 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप

सांगली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात 502 लाभार्थ्यांना 32 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून आत्तापर्यंत 80 लाख रुपये व्याज परताव्याची रक्कम अदा केली आहे, व्याज परताव्याची मंजूर रक्कम शासन 100 टक्के अदा करित आहे, त्यामुळे बँकांनी कर्जाच्या हमीबाबत शंका न बाळगता तात्काळ प्रकरणे मंजूर करावीत असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र यादव, बँकर्स, जिल्हा कौशल्य विकास व स्वयंरोजगार अधिकारी सं. कृ. माळी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील, किशोर साळुंखे, विशाल पाटील, निशा पाटील, शितल पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विलास देसाई तसेच जिल्हातील विविध बँकांचे प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संजय पवार म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात 32 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून आत्तापर्यंत 80 लाख रुपये इतकी व्याज परताव्याची रक्कम अदा करण्यात आली आहे.

व्याज परताव्याची मंजूर रक्कम शासन 100 टक्के अदा करित आहे, त्यामुळे बँकांनी कर्जाच्या हमीबाबत शंका न बाळगता तात्काळ प्रकरणे मंजूर करावीत असे आवाहनही त्यांनी उपस्थित सर्व बँकांना केले. तसेच या योजनेच्या शासन निर्णयात ज्या अटी व शर्तींमध्ये नमुद नाही अशा अटी व शर्ती लागू करुन कोणतेही कर्ज प्रकरण नामंजूर करु नये, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.या योजनेचा मुख्य उद्देश तळागाळातील सुशिक्षत तरुण-तरुणींना व्यावसाय सुरु करण्यासाठी मदत करणे असा आहे. तरुणांनी नोकरी मागे न धावता नोकऱ्या निर्माण करणारा व्यवसायीक बनावे असे आवहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या सूचनेनूसार तयार करण्यात आलेल्या अर्जांची नोंद व सदस्थिती पाहण्यासाठीच्या वेब पोर्टल ॲप्लीकेशनचे उद्घाटन संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या ॲप्लीकेशन पोर्टलमुळे लाभार्थ्याची सद्यस्थिती समजणार आहे. व प्रलंबित प्रकरण निपटारा करण्यासाठी मदत होणार आहे. जास्त काळ लाभार्थ्याची कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवता येणार नाहीत. 15 दिवसांच्या आत लेखी नोटसीने सोडविण्यासाठीचे बँकांना बंधनकारक राहिल. यावेळी संजय पवार यांनी या पार्टलची माहिती घेवून जिल्हाधिकारी यांचे मनापासून कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील यांनी केले. तर आभार जिल्हा कौशल्य विकास व स्वयंरोजगार अधिकारी सं. कृ. माळी यांनी मानले 

टॅग्स :Annasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळSanjay Pawarसंजय पवारSangliसांगली