शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी तात्काळ कार्यवाही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 17:08 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रती शेतकरी कुटूंबाला प्रति वर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी तात्काळ कार्यवाही सुरूसांगली जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांचे आदेश

सांगली  : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रती शेतकरी कुटूंबाला प्रति वर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचे काम वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम, समितीची कार्ये व जबाबदारी नेमून दिलेली आहेत. त्याची दिलेल्या मुदतीत काटेकोर अंमलबजावणी करावी. या कामी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी व तात्काळ कार्यवाही करावी, असे आदेश अधिकाऱ्यांना देऊन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व इतर माहिती संबंधित गाव पातळीवरील अधिकाऱ्यांकडे तात्काळ जमा करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (ढट-ङकरअठ) योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत तर निवासी उपजिल्हाधिकारी हे समन्वय अधिकारी तथा जिल्हास्तरीय नोडल अधिकारी आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, डीस्ट्रीक्ट डोमेन एक्सपर्ट, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी हे सदस्य आहेत. या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सूचित केले.जिल्हाधिकारी काळम म्हणाले, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (ढट-ङकरअठ) योजना सुरू केली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुटूंबाला प्रति वर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहेत.

या समित्यांनी तात्काळ बैठका घ्याव्यात. तसेच, त्यांना प्रशिक्षण द्यावे. योजनेशी संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवावा. निश्चित करून देण्यात आलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार माहिती संकलनाचा दैनंदिन आढावा घ्यावा. क्षेत्रीय स्तरावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करावे, असे त्यांनी सूचित केले.तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी आहेत तर तहसिलदार समन्वय अधिकारी तथा तालुकास्तरीय नोडल अधिकारी आहेत. तसेच उपविभागीय कृषि अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हे सदस्य आहेत. या समितीने ग्रामस्तरावरून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करायचे आहे. कालबद्ध कार्यक्रमानुसार काम करत, संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिल्या.ग्रामस्तरीय समितीचे समिती प्रमुख तलाठी आहेत. तसेच ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक व वि.का.से.स.सो. चे सचिव हे सदस्य आहेत. या समितीने शेतकरी कुटुंबाची निश्चिती करायची आहे. यासाठी राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम व कृषि गणनेची माहिती प्राप्त करून घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली